चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी तालुक्यातील मालवंडी गावातील बाळूमामा मंदिर परिसरात वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मूळ गुन्ह्यात आणखी कठोर कलमे जोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव अनिल थोरात (वय 20, रा. मालवंडी, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता बाळूमामा मंदिर परिसरात आरती सुरू असताना वाद झाला. आरतीनंतर विशाल किशोर बारंगूळे याने मुद्दाम फिर्यादीच्या पायावर पाय दिल्याने वाद निर्माण झाला.
या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. मयूर विकास कावरे, विशाल किशोर बारंगूळे, पृथ्वीराज धनाजी काटे व प्रमोद श्रीमंत पाटील यांनी महादेव थोरात यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. याच वादात पृथ्वीराज धनाजी काटे याने लोखंडी कुऱ्हाडीने महादेव थोरात यांच्या उजव्या मनगटावर वार केला.
वाद वाढल्यानंतर नितीन लहू सलगर हा भांडण सोडवण्यासाठी पुढे आला. मात्र, विशाल किशोर बारंगूळे याने खाली पडलेली लाकडी काठी उचलून नितीन सलगर यांच्या डोक्यात जबर मार केला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
जखमी नितीन सलगर याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मूळ गुन्हा आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आधीच गु.र.क्र. 62/2025 नुसार भारतीय दंड संहितेच्या 118(1), 118(2), 115(2), 351(29), 352, 3(5) कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
यात गंभीर मारहाणीच्या कलमांचा समावेश आहे.
नितीन सलगर यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर कलम 304 (दाखल मृत्यु) किंवा कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, आरोपींच्या सहभागाचा तपास सुरू आहे.
पोस्टमॉर्टेम अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यास कलम 304 (अनवधानाने मृत्यू) किंवा कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा वाढवला जाईल.


0 टिप्पण्या