Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापक श्री विजय लांबट यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा सोहळा संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी  
भद्रावती : येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय झेड. लांबट सर हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार व निरोप समारंभ विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा संस्थेचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी स्वान साहेब आणि प्रमुख अतिथी स्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ. श्री. प्रकाश महाकाळकर हे होते.
त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून संस्थेच्या सदस्या सौ. मायाताई राजुरकर, ज्येष्ठ सदस्य श्री. झेड. बी. लांबट सर, केंद्रप्रमुख श्री. मोरेश्वर विद्ये सर आणि सत्कार मूर्ती श्री. विजय लांबट सर, सौ. उज्वला विजय लांबट आणि संपूर्ण लांबट परिवार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.
विद्यालयातील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे शब्द सुमनाने स्वागत केले.
ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका सौ. कल्पना बांदूरकर यांनी आपल्या प्रस्ताविकातून श्री. विजय लांबट यांच्या अध्यापकीय वाटचालीबद्दल व शैक्षणिक सेवाकार्याबद्दल माहिती दिली.
कु. रतीका आस्वले, कु. अनन्या खांडरे, कु. किरण पिंपळकर
या विद्यार्थिनींनी लांबट सरांबद्दलच्या आपल्या गोड आठवणींना उजाळा दिला.
सेवानिवृत्त शिक्षक श्री. बळवंत पावडे यांनी आपल्या सुरेल आवाजातील कवितेद्वारे लांबट सरांबद्दल गुणगौरव व्यक्त केला.
गटशिक्षणाधिकारी डॉ. श्री. प्रकाश महाकाळकर यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यातून सरांबद्दलच्या आठवणी आणि अनुभवांना उजाळा दिला.
प्रमुख अतिथी सौ. मायाताई राजूरकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लांबट सरांचे सुपुत्र डॉ. फाल्गुन लांबट यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातुन आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल समस्त शिक्षक वर्गाचे आभार मानले.
सत्कार मूर्ती श्री. विजय लांबट सर यांनी आपल्या मनोगतातुन संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तमजी स्वान यांनी लांबट सरांच्या मुख्याध्यापकीय कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार व्यक्त करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. तुकाराम पोफळे आणि आभार प्रदर्शन शिक्षक श्री. दयाकर मग्गीडवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशा गावंडे, संजय आगलावे, विनोद गावंडे, मेघा ताजने, शीतल जीवने, मीना मॅडम,  रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे, सीमा सावंकर आदींनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या