चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शनिवारी दि. 29/3/25 रोजी राबविण्यात आलेल्या सीईटी नीट सराव परीक्षेला उदगीर तालुक्यात विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेची ऑनलाईन नोंदणी ऑफलाइन नोंदणी करण्यात आली होती. उदगीर तालुक्यात 104 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 36 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली व 68 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन नोंदणी केली होती.
ही परीक्षा विवेकानंद केमिस्ट्री क्लासेस या सेंटरवर आयोजित केली होती.
बारावीनंतर इंजिनिअरिंग, फार्मसी,लॉ व मेडिकल अभ्यासक्रमास सीईटी नीट परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेची विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याचा अनुभव यावा म्हणून युवासेनेच्या वतीने ही परीक्षा आयोजित केलेली असते. यातून विद्यार्थ्यांच्या मनातील दडपण दूर होते. त्यामुळे ही परीक्षा दरवर्षी होते.
ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी उदगीर युवासेना वतीने कैलास पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, तात्याराव मुंडे,उपेंद्र काळेगोरे जैन उपजिल्हाअधिकारी, रोहित पाटील शहर अधिकारी, धोंडीराम गुट्टे तालुका अधिकारी जळकोट,सुरज उदगीरकर उपशहर प्रमुख,प्रा.सौ. भंडारे मॅडम, माधव भंडारे सर,तानाजी माने पाटील, धीरज वाघमारे उपस्थित होते.


0 टिप्पण्या