हाळी-हंडरगुळीतील व्यापारी,शेतकरी ञस्त.
———————————————
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-हाळी-हंडरगुळी (ता.उदगीर) येथील बाजार पेठ मध्ये गत कांही दिवसा पासून मोकाट शेळ्यांनी धुडगूस घालुन धिंगाना करण्याचा सपाटा लावल्यामुळे बिच्चा-या व्यापारी बांधवांच्या अन्नधान्याचे मोठे वाटोळे होत आहे.आणि एखाद्याने मोकाट शेळीला थोडावेळ बांधून ठेवल्याचे समजताच शेळ्यांसारखे मोकाट असलेले त्या शेळ्यांचे कांही मालक मंडळी व्यापारी बांधवाशी अरेरावी करत असल्याचे बोलले जाते.म्हणुन या शेळ्यांच्या धिंगाण्याला वैतागलेले व्यापारीबांधव नको ती झंगट असे म्हणुन पोलीस तक्रार देत नसल्याचे कांही व्यापा-यांचे म्हणणे आहे.. हाळी-हंडरगुळीतील कांही लोकांनी गाय,म्हैस,बैल व शेळ्या खरेदी केल्या. पण..यापैकी एकाकडेही "पसाभर" सुध्दा शेती नाही.तरीही त्यांनी वरील गुरे खरेदी केली.व ती सर्व गुरे फुकटचे खायला मोकाट सोडून दिले आहेत.आणि हे सगळी गुरे कुणब्याच्या गुरांपेक्षाही धुष्टपुष्ठ दणकट दिसतात.कारण,राञंदिवस मोकाटपणे मार्केटसह अनेकांच्या शेतामध्ये धुडगूस घालीत हिंडतात ना म्हणुन..!! यामुळे हळी हंडरगुळीतील अनेकांच्या शेतातील पिकांचे तसेच व्यापा-यांच्या दुकाणा मधील अन्न धान्याचे व इतर साहित्याचे मोठे नुकसान हे मोकाट शेळ्या {गुरे} करत आहेत.तर कांही शेळ्या दुकाणाच्या छतावर / पञावर चढून धिंगाणा घालतात.या सर्व मोकाट गुरांमुळे अनेकजण ञस्त,हैराण झाले असून रोज शेकडो रुपयांचे हकनाक नुकसान शेतकरी व व्यापारीबांधवांना सहन करावे लागते. तरीही याकडे कुणीच लक्ष देत नाही.म्हणुन मोकाट गुरांच्या रोज होणा-या ञासाला वैतागलेले कांही व्यापारी व शेतकरी यांनी एखाद्या मोकाट गुराला बांधून ठेवले आणि हे त्या गुराच्या मोकाट मालकाला समजले की लगेचच मोकाट गुरांचे कांही मोकाट मालक हे अरेरावी करतात.अशी चर्चा व्यापारी तसेच शेतकरीबांधवामधून होत आहे.तेंव्हा त्यांच्या अरेरावीचे वेगळे स्वरुप होऊ नये, यासाठी संबंधित यंञणेंनी त्वरीत दखल घेणे गरजेचे आहे.
*कांही गुरे चोरीचे असू शकतात!* अशी शंका हाळीतील जाणकार मंडळी व्यक्त करतात.
कारण,ज्या-ज्या लोकांनी फुकटचे खाण्यासाठी शेळ्या व अन्य गुरे मोकाट सोडले आहेत.त्या सोडलेल्या गुरांपैकी खरेदी घेतलेली गुरे किती? अन् चोरीचे गुरे किती? याचा प्रामाणिक पणे शोध घेतल्यास "दूध का दूध व पाणी का पाणी" होऊ शकते.कारण फुकटचे खायसाठी मोकाट जनावरे सोडलेल्या लोकांपैकी कांही व्यक्तीवर यापुर्वी गुरे चोरल्याची पोलीस केस दाखल आहे.यामुळे आज हाळी व हंडरगुळीत फुकटचे खाण्यासाठी मोकाट सोडलेले गाय,म्हैस,बैलं व शेळ्या या पैकी एकतरी जनावर हे चोरीचे असणारच!! यात शंका नाही. अशी चर्चा, कुजबूज हाळीत सुरु आहे.तरी याची सखोल चौकशी व्हावी व मोकाट गुरांचा बंदोबस्त संबंधित यंञणेनी करावा,अशी मागणी हाळी हंडरगुळीतील ञस्त जनतेची आहे.


0 टिप्पण्या