चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर:- शहरातील गजबजलेल्या रुईकर कॉलनीतील शिंदे रेसिडेन्सी येथील बीएसएनएलमधील निवृत्त अधिकारी नामदेव दगडू खाडे यांच्या मालकीचा साई समर्थ बंगला फोडून सराईत चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले ३० तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजारांची रोकड लंपास केली. शनिवारी भरदिवसा दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. घरमालकाची चाहूल लागताच चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा आतील बाजूने बंद करून टेरेसवरून पोबारा केला. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


0 टिप्पण्या