चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनीधर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजच्या पिढीला समजावे व त्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव व्हावी. यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यावर्षी 28 फरवरी ते 29एप्रिल या दरम्यान बलिदान मास आचरण्यात येणार आहे. तळेगाव दशासर परिसरात बलिदान मास पाळण्याबाबत श्री शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जागृती केली जाणार आहे. दगाफटका करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. औरंगजेबाने धर्मांतरासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. परंतु. शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही. हे ठासून सांगितल्यानंतर त्यांचे एक एक अवयव काढण्यात येत होते. हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण असणाऱ्या गुढी पाडव्यादिवशीच क्रूरकर्मा औरंगजेबाने शंभूराजांची निघृण हत्या केली. तसेच त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतस्ततः विखुरण्यात आले. त्यामुळे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची अंत्ययात्राही काढता आली नाही. या बलिदानाचे हिंदू धर्मियांना स्मरण व्हावे. यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने धर्मवीर बलिदान मास आचरला जातो. संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभूराजांना श्रद्धांजली वाहिली जाते.त्या आणुशंगणे अक्षय चंदेल यांचा वाणीतून तरुणा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास सांगण्यात आला तसेच तरुण मंडळी आपल्याला आवडती एखादी वस्तू अथवा पदार्थ वर्ज्य करून धर्मवीर बलिदान मास पाळतात. प्रत्येक गावामध्ये बलिदान मास पाळला जावा.यासाठी श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने जागृती केली जातात बलिदान मास मूक पदयात्रा काढली जाते. छत्रपती शिवाजी महाराज चौक मेडिकल चौक चुठे चौक.चाहकर महाराज मंदिर हनुमान मंदिर आठवडी बाजार मराठी शाळा ततेश्वर मंदिर पोस्ट ऑफिस शहीद दीपक ठाकरे चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गाने कडणायात मूक पदयात्रा काढली जाते


0 टिप्पण्या