Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडीची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई - वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत सभा, माथाडी कामगार युनियन, मुंबई, ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील सर्व पदधिकारी, कार्यकर्त्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक आंबेडकर भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, यावेळी ते महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

• बौध्द समाज संवाद दौरा उर्वरित नियोजन.
• पदाधिकारी कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिराचे नियोजन.
• संवाद दौऱ्याचे भव्य समारोप कार्यक्रमाचे नियोजन  आदी प्रमुख विषय या बैठकीत चर्चिले जाणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या