Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत 15 घंटे लाईट गुल गरमीमुळे बालकांची रडारडं;तर पालकांची पळापळ..,,,

 
चित्रा न्युज प्रतिनिधी
 लातूर:-मान्सुनपुर्व कामे करण्यासाठी दि.२९ रोजी पहाटे 5 ते दु.2 पर्यंत वीज बंद असेल,याची जनतेनी नोंद घ्यावी. अशा प्रकारचे मेसेज स्टेटसवर व वाट्सअप ग्रूपवर एम.एस.ई.बी.तर्फे सेंड करण्यात आले होते.म्हणुन दि. 29 रोजी दु.2 वाजता लाईट येणार, अशी चर्चा होती.आणि ही चर्चा व मेसेज खरे झाले.माञ,दु.5 वाजले तरीही जुनी बाजार गल्ली,हंडरगुळी येथील माळी डि.पी.वरची लाईट कांही आली नाही.यामुळे अनेकांनी वीज अभियंता व कर्मचारी यांना फोन केले पण जे.ई.सह कर्मचारीही कव्हरेज क्षेञाच्या बाहेर गेल्याचे त्या सगळ्यांच्या फोनमध्ये ऐकू येत होते.
एकीकडे कडाक्याचे ऊन/गरमी तर दुसरीकडे 15 तास लाईट बंद.यामूळे गरमीचे चटके बसू लागल्याने लहान बालकांची रडारड ऐकू येत होती.तर 2 वा.येणारी लाईट 5 वाजलेतरीही का आली नाही.धावाधाव,विचारपुस करणारे पालक,जनता दिसत होते.व जे.ई.सह कार्यालयाचा फोन आऊट आॅफ कव्हरेज असा सांगत/बोलत होता.केवळ बाजार गल्ली मधील जनतेनीच असे काय घोडे मारलेय की,या गल्लीतील माळी डी.पी.वरचा फाॅल्ट गत 10 वर्षापासून एम.एस. ई.बी.वाले काढत नाहीत.विशेष म्हणजे आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच यांची ही गल्ली, तरीही येथे कधीच लाईट व्यवस्थित चालत नाही.दि.२९ रोजी तर महावितरण खात्याने कहरच केला.दु.2 पर्यंत वीज येणार नाही असे वाट्सअपवर जाहीर केले आणी पाच वाजले तरी या गल्लीतील वीज आली नाही.
परिणामी अनेकांचे इनर्व्हटर हे पण बंद पडले.म्हणुन अनेकजण विशेष करुन वयस्कर व लहान मुलांचा जीव गरमीमुळे कासावीस झाला. तेंव्हा या डी.पी.वरचा फाॅल्ट कायम स्वरुपी दुर व्हावा आणि वीज कायम स्वरुपी योग्य दाबात चालू रहावा,या साठी गाव,गल्लीतील पुढा-यांसह जे.ई.व कर्मचारी यांनी कष्ट करणे गरजेचे आहे.असा सुर जुनी बाजार गल्ली हंडरगुळीतील जनता काढतेय..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या