चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : में.अरबिंदो कंपनी बेलोरा तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर , विभागीय आयुक्त नागपूर यांच्यासह ८ जनांचा विरुद्ध जनहित याचिका दाखल झाली असून नोटीस इशु झाले आहे.
माननीय न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
असून दोन आठवड्यात दिनांक ०८/०५/२०२५ पर्यंत उत्तर मागितले आहे.
याचिका कर्ता तर्फे अँड रेणुका सिरपुरकर जेष्ठ वकील म्याडम नागपूर यांनी बाजू मांडली.
उतरवादी १ते ७ तर्फे अँड. एस.एम.उके यांनी तर उतरवादी ८तर्फे अँड.आर.एस.धुमाने यांनी बाजू मांडली
संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी बेलोरा येथील शेतकरी सुधाकर मत्ते व इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण घटनाक्रम तयार करून प्रकरण अँड. रेणुका सिरपुरकर म्याडम जेष्ट वकील यांना समजावून सांगितले.
अँड.रेणुका सिरपुरकर म्याडम वरिष्ठ अधिवक्ता नागपूर यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल केली.
बेलोरा गावकऱ्यांसह ११ गावकऱ्यांना में.अरबिंदो कंपनी महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून पुनर्वसन व पुनरस्थापना न करता सरकारी रस्ते बंद करून वेठीस धरून,अन्याय अत्याचार करत होती व आजही करीत आहे हे समजावून सांगितले
एवढेच नव्हे तर में अरबिंदो कंपनी च्या नावाने बोगस फेरफार पत्राला आदेश समजून एका दिवसात फेरफार घेऊन त्याच दिवशी फेरफार प्रमाणीत केले व में.अरबिंदो कंपनीच्या नावाने ७/१२केले.
हा सर्व प्रकार मागील अनेक दिवसांपासून विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी यांनी शासन प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिले होते मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन कंपनीला मदत करीत होते.
एवढेच नव्हे तर याच कंपनी मध्ये सेवानिवृत्ती झालेले तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी, नौकरी करीत असुन बोगस कामे करून कंपनीला मदत करीत आहेत.
त्यांचे पेंशन बंद करावे अशी मागणी केली आहे.
ज्याअर्थी मौजा बेलोरा गावाचे पुनर्वसन व पुनरस्थापना मागील ३०-३५ वर्षांपासून तेव्हाची डागा कंपनी व आताची में अरबिंदो कंपनी यांनी केले नाही.
तरीही सदर कंपनी जबरदस्तीने ११ गावातील सरकारी पांदन रस्ते उद्ध्वस्त करून अवैध कोळशाचे उत्खनन मागील ५ वर्षापासुन करीत आहे.
तात्काळ सदर कंपनीचे काम बंद करन्याचे आदेश पारित करावे,व योग्य मोबदला न्याय व हक्क मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कंपनी विरुद्ध नोटीस इशु झाले असून पुढील सुनावणी ०८/०५/२०२५आहे.
विशेष म्हणजे अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात सुद्धा विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी बेलोरा येथील गावकऱ्यांना सोबत घेऊन में.अरबिंदो कंपनीचा बोगस फेरफार विरुद्ध अपील दाखल केली असून पुढील सुनावणी २०/०५/२०२५ रोजी होणार आहे.
0 टिप्पण्या