चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने समाज कल्याण विभागाच्या 7000 कोटी रुपयांच्या निधीचा वापर ‘लाडकी बहीण योजना’साठी वळवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
"सामाजिक न्याय विभाग आहे की अन्याय विभाग?" असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला.
पुणे शहराध्यक्ष चैतन्य प्रभाकर इंगळे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये 'स्वाधार' योजनेविषयी मागवलेल्या माहितीबाबत ती दिशाभूल करणारी असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच पुण्यातील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याने, त्यांचा सविस्तर डेटा समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराध्यक्ष चैतन्य प्रभाकर इंगळे, महासचिव जान्हवी शेलार, उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख राज सरोदे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, उमेश साळवी, परमेश्वर सणादे, हरिभाऊ वाघमारे, अरविंद कांबळे, रोहन गायकवाड, वंचित बहुजन माथाडी संघाचे माजी अध्यक्ष अजय भालशंकर, दत्ता शेंडगे, वंचित बहुजन युवा आघाडीचे अरुण इंगळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता चव्हाण, कोमल शेलार व निरंजना सोनवणे आदी उपस्थित होते.
या सर्व मागण्यांचं निवेदन समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना देण्यात आलं असून, मागण्या पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.


0 टिप्पण्या