Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर येथे रेल्वे गाडीवर दगडफेक ; दगडफेकीत चिमुकलीचा मृत्यू !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-येथे रेल्वेगाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, ही घटना धक्कादायक असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
दगडफेकीत एका चिमुकलीचा मृत्यू झाला,  दगड तिच्या डोक्याला लागल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
 
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून,  आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.  

या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या