(मदिना मस्जिद चे उपक्रम)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-सर्व धर्म समभाव व एकतेचे प्रतीक असलेले भंडारा जिल्हा व पवनी तालुक्यातील अडयाळ या गावी रमजान ईद उत्साह व आनंदात साजरी करण्यात आली. सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह व मस्जिद मध्ये जाऊन प्रार्थना करून एक दुसऱ्यांना गळा भेटी करून शुभेच्छा दिली तथा देशात सर्व समाजात एकात्मता, सुख- समृद्धी, शांती साठी प्रार्थना करण्यात आली. मदिना मस्जिद चे अध्यक्ष सोहेल खान यांचे अध्यक्षतेखाली मस्जिद कमिटी आणि सर्व सदस्यांनी मिळून शिवाजी चौक मध्ये स्थित असलेले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज च्या स्मारकाला माल्यार्पण करून एकात्मतेचा संदेश दिला. याप्रसंगी मशीद कमिटीचे सेक्रेटरी नीसार खान उपाध्यक्ष रेहान खान, सदस्य शाहिद खान, साजिद खान, सलमान खान, नसीम खान, शहज़ाद खान, जुबेर खान, पाशु खान, वसीम खान, अल्ताफ खान, अशफाक खान, राजा खान, अख़्ज़र खान छत्रपति शिवाजी महाराज समिति चे भूषण लंबाट, शुभम लंबाट, हर्षल पोटवार, अंकुर गिरडकर, नितिन वर्गंटीवार ई सह नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या