Ticker

6/recent/ticker-posts

परभणीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, ज्यामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत, हीच बाब लक्षात घेत परभणी शहरातील वंचित बहुजन युवा आघाडीचे कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हा उपाध्यक्ष संदीप खाडे, गौरव कुमार तारू ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. 

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉ.संकेत वाघ, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम जटाळे, विजय नंद, मिकुल मेकव्वान, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते. तसेच हे शिबिर संपन्न होण्याकरिता मुंजा ढगे, सिद्धार्थ इंगोले, विष्णू कापसे, सिद्धार्थ खंदारे, बुद्धपाल कांबळे, भीमा निसर्गाध, रोहन कापुरे, रवी काकडा, धनंजय धबाले, राहुल धबाले, अरबाज खान, राहुल येडे, शेख आसेब यांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या