Ticker

6/recent/ticker-posts

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडच्या वसुली अधिकाऱ्यावर तब्बल ६.३९ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी

बिड:- भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडच्या अंबाजोगाई शाखेत कार्यरत असलेल्या वसुली अधिकाऱ्याने तब्बल ६ लाख ३९ हजार ८७५ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३१८(४), ३१६(२) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर क्र. ०१६१) दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार इम्रान सय्यद (रा. संभाजी चौक, माजलगाव) हे भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडमध्ये सप्टेंबर २०२४ पासून शाखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जबाबानुसार, कार्तिक परमेश्वर पुंड (रा. घनसागवी फाटा, सावतानगर, अंबड, जि. जालना) यांची १६ जानेवारी २०२३ रोजी वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते गेल्या १६ महिन्यांपासून नियमितपणे कर्जदार महिलांकडून हप्त्याच्या स्वरूपात रक्कम वसूल करून शाखेत जमा करत होते.

मात्र, मे २०२४ मध्ये झालेल्या ऑडिटमध्ये ३७,५५४ रुपयांच्या अपहाराचा संशय व्यक्त झाला. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसऱ्या ऑडिटमध्ये अधिक गंभीर प्रकार उघड झाला. एकूण ५३ महिलांकडून ६ लाख २ हजार ३२१ रुपये प्रिपेमेंट स्वरूपात वसूल करून जमा न केल्याचे समोर आले. तक्रारदार अधिकारी इम्रान सय्यद यांनी महिलांकडे थेट चौकशी केल्यानंतर, महिलांनी प्रिपेमेंट दिल्याची कबुली दिली.

कार्तिक पुंड याने महिलांकडून वसूल केलेली रक्कम शाखेत जमा न करता स्वतःकडेच ठेवल्याचे स्पष्ट झाले असून, काही महिलांना तर पावतीसुद्धा दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित वसुली अधिकाऱ्याने मुद्दामहून विश्वासघात करून कंपनीची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी १६:३८ वाजता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हा प्रकार आर्थिक संस्थांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, संबंधित वसुली अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी आता उचलून धरली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या