Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री या पदावर नितीन काकडे यांची निवड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-उत्तर प्रदेश येथील बाराबंकी येथे  अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वसाधारण सभा दिनांक १३ व १४ एप्रिल ला पार पडली.

राष्ट्रीय अध्यक्ष श्री नारायण भाई शहा  यांनी  भंडारा येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे विदर्भ प्रांत सचिव  श्री नितीन काकडे  यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत  संपूर्ण महाराष्ट्रातील चार प्रांत कोकण, देवगिरी, मध्य महाराष्ट्र  व विदर्भ ची जबाबदारी सोपवून त्यांची पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री या पदावर  पुढील ३ वर्षा करीता निवड केली.
भंडारा जिल्हा संघटन मंत्री जयंत सब्जीवाले, सचिव अनिल शेंडे, नगर अध्यक्ष रविद्र तायडे, संजय आयलवार, चंद्रशेखर साठे, लोकेश मोहोबंशी, प्रकाश कुरोडे, खेडीकर, पारधी साहेब, प्रसिद्धी प्रमुख  सईद शेख, जयश्री सातोकार, दीप्ती कुरोडे, विष्णू पंत पंडे यांनी त्यांचे अभिनंदन करून नवीन जवाबदारी करीता शुभेच्छा दिल्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या