Ticker

6/recent/ticker-posts

महाबोधी महाविहार शांतता पदयात्रेचे लंडन मध्ये आयोजन!

चित्रा न्युज ब्युरो 
लंडन : महाबोधी महाविहार सपोर्ट ग्रुप यूकेच्यावतीने आयोजित केलेली शांतता पदयात्रा लंडनमध्ये पार पडली. या पदयात्रेने शांती आणि एकतेची भावना जनमानसात तयार केली. 

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी इंग्लंडमधील बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते.  यामध्ये वंदनीय बौद्ध भिक्षूंसह सुमारे ३०० धम्म अनुयायांनी सहभाग घेतला. विविध बौद्ध संगठना यात सहभाही होत्या.

ही शांततापूर्ण मिरवणूक हाइड पार्क, लंडन शहर येथून सुरू झाली. पिकाडिली सर्कस, ट्रॅफलगर स्क्वेअर आणि पार्लमेंट स्क्वेअर अशा लंडनमधील प्रतिष्ठित स्थळांमधून जात शेवटी भारतीय उच्चायुक्तालयात याची सांगता झाली. 
पूज्य भंते कसप्पा यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.  भंतेंनी  उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले आणि महाबोधी महाविहारच्या मुक्तीसाठी सगळ्यांनी एकत्र येणे का गरजेचे आहे हे अधोरेखित केले.

युनायटेड किंग्डमच्या विविध प्रदेशातील धम्म अनुयायांनी करुणा आणि चिकाटीच्या चिरस्थायी मूल्यांना मूर्त रूप देत शांतता पदयात्रेत सहभागी होण्यासाठी खूप लांब प्रवास करून धम्माप्रती निष्ठा दाखवून दिली.  लहान मुलांसह कुटुंबे देखील या कार्यक्रमात उपस्थित होती, त्यांनी धम्माच्या तत्त्वांप्रती त्यांची अटळ वचनबद्धता दर्शविली. उल्लेखनीय म्हणजे, इंग्रजी बौद्धांनीही या कार्यक्रमात भाग घेतला.

विशेष म्हणजे या प्रसंगी युके पंतप्रधानांना महाबोधी मोहिमेला पाठिंबा मागण्यासाठी एक निवेदन सादर करण्यात आले आणि त्यांचा या आंदोलनासाठी पाठिंबा मागण्यात आला. 

या शांती पदयात्रेसाठी अनेकांनी अथक परिश्रम घेतले.  यामध्ये महाबोधी महाविहार सपोर्ट ग्रुप यूकेच्या उत्स्फूर्त स्वयंसेवक यांचा प्रामुख्याने सहभाग होता. सगळ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. 

महाबोधी शांती पदयात्रेने तथागत बुद्धांच्या शाश्वत शिकवणी नुसार सगळे सोबत आले, तर शांती आणि एकतेच्या माध्यमातून आपले म्हणणे जगासमोर मांडता येते हे दाखवुन दिले.  सहभागींनी महाबोधी महाविहारच्या योग्य देखभाल आणि संवर्धनासाठी, महाबोधी विहारावर संपूर्णपणे बौद्ध बांधवांचे नियंत्रण असावे, बीटी ऍक्ट १९४९ रद्द करावा या मागण्या करण्यात आल्या.

ही शांती यात्रा यशस्वी करण्यात अनुकरणीय योगदान दिल्याबद्दल आयोजन समिती प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानले आहेत.

#London #BTact1949_Repeal #महाबोधि_मुक्ति_आंदोलन #PrabuddhBharat #news

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या