Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीला बाजारचे गाव ही ओळख पुन्हा मिळणार

सपोनी.बी.एस.गायकवाड यांनी घेतली चिञा न्यूजच्या बातमीची दखल


 चिञा न्यूज प्रतिनिधी,        
हंडरगुळी :-महामार्गावर व जि.प.शाळेलगतच होणा-या चिकण,मटण विक्रीचा फायदा ना ग्रा,पंचायतला,ना सा.बां खात्याला,ना अन्न व औषध प्रशासन खात्याला,ना शिक्षण खात्याला! तरीही अवैधरित्या सर्रास उदगीर तालुक्यातील बाजारचे व महामार्गा लगत असलेल्या हाळी-हंडरगुळी या गावात जि.प.शाळेच्या मेन गेट समोर महामार्गावर / उघड्यावर माॅंस विक्री होतेच कशी ? या विक्रेत्यांना वरील पैकी आर्शीवाद कोणात्या खात्याचा, या व अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ अनेक सजग नागरीकांनी उठवले होते.म्हणुन या बाबत चिञा न्यूजने सचिञ अशी बातमी दिली. असता या अवैध धंद्यावर कारवाईची जिम्मेदारी असलेले वरील खात्यातील अधिकारी एसी मध्ये आणि वाढवणचे कर्तबगार सपोनी. बी.एस.गायकवाड हे पुन्हा एकदा ग्राउॅंड वर आले.आणि सर्व माॅंस विक्रेत्यांना व संबंधितांना या बातमी मागचा उद्देश व होणारी संभाव्य कारवाई याची सविस्तर माहिती विक्रेत्यांना व २ ही गावच्या सरपंच,उपसरपंच यांना दिली.तेंव्हा हाळी-चाकुर जाणा-या रोडलगत एक मोठा खड्डा २ ग्रा.पं. खोदणार व त्यात माॅंस विक्रेते वेस्टेज माल नेऊन टाकणार.अशी ग्वाही ग्रा.पं.प्रशासन व विक्रेत्यांनी दिली.म्हणुन पुन्हा या गावाला बाजारचे गाव ही ओळख सपोनी.बी.एस.गायकवाड यांच्या मेहनतेमुळे मिळेल! अशी आशा येथील पोलीस चौकीत २९ मे रोजी आयोजित बैठकीत उपस्थित होते , त्या सर्वांनी व्यक्त केली.व या बाबत आजवर अन्य कुणीही पेपरबाजी केली नाही.पण चिञा न्यूजने सतत पेपरबाजी करुन संबंधितांचे लक्ष वेधून रोखठोक लिखान केल्याबद्दल चिञा न्यूजचे अभिनंदन व कौतूक उपस्थितांतून व सर्वस्तरांतून होत आहे.
हे विशेष..
गेली १०० वर्षांची परंपरा असलेला गुरांचा बाजार हा हंडरगुळी ग्रा.पं.चे हद्दीत भरतोय.नाव माञ पाच फुट अंतरावर असलेल्या हाळीचे.असे असलेतरीही बकरी ईद पुर्वी २९ मे रोजी संपन्न झालेल्या शांतता समिती बैठकीत हा विषय प्रकर्षाने चर्चेमध्ये आला.आणि अवैधरित्या उघड्यावर माॅंस विकणारे निरुपयोगी माल मेन रोडवर,तिरु नदीपाञात व पुलावर टाकत असल्याने जवळपास दिड कि.मी.दुरवर याचा घाणवास,दुर्घंधी सुटून नागरिकांना ञास होत असे.
म्हणुन हा वास येताच हाळी हे गाव आले बघा.अशी हाक वाहक,चालक व प्रवाशी मारायचे !  यामुळे सलग १०० वर्षे बाजारचे गाव ही ओळख मिळालेली होती.माञ घाणवास, उघड्या वातावरणात होणारी माॅंस विक्री यामुळे बाजारचे गाव ही चांगली ओळख पुसून घाणवासाचे गाव ही ओळख प्राप्त झाल्यामुळे जनतेमध्ये तिव्र संताप व नाराजी पसरली आहे. पण या विरुध्द कोणीही 'ब्र' सुध्दा म्हणायला व लिहायला तयार नाही. पण आम्ही चिञा न्यूज मध्ये सतत बातम्या प्रकाशीत करुन शिक्षण,सार्वजनीक बांधकाम,अन्न व औषधी प्रशासन या खात्याचे लक्ष वेधून घेतले असता या बाबत वरील प्रशासनाने नेहमीसारखे 'स्पेशली' दुर्लक्ष करीत आहेत.परंतू वाढवणचे कर्तबगार सपोनी.बी.एस. गायकवाड यांनी या प्रकरणात पुन्हा विशेष लक्ष घातले आणि बकरी ईद निमित्ताने आयोजित शांतता समिती बैठकीत माॅंस विक्रेते,सरपंच आणि उपसरपंच यांना या म्हत्वाच्या प्रश्नात लक्ष घाला आणि वेस्टेज माॅंस गावा बाहेर टाका,अन्यथा पोलिसी खाक्या दाखविणार.असा इषारा दिला. असता चाकुर रोड लगत एक खड्डा खोदणार व यासाठी हाळी ग्रा.पं.व हंडरगुळी ग्रा.पं.खर्च देणार.आणि त्या खड्यामध्ये स्वत: माॅंस विक्रेते वेस्टेज माल नेऊन टाकणार.असे ठरले.आणि वेस्टेज माॅंस त्या खड्या मध्ये नेहमी टाकण्यात येईल आणि यासाठी माॅंस विक्रेत्यांकडून येणारा खर्च घेण्यात येईल.असा शब्द माॅंस विक्रेता संघाचा सदर,प्रमूख अयाज गुलामरसूल कुरेशी यांनी दिली आहे.
सपोनी.बी.एस.गायकवाड,पो.हे.काॅं. शिवप्रताप रंगवाळ,सरपंच विजय अंबेकर,उपसरपंच बालाजी भोसले, उपसरपंच राजू पाटील,जेष्ठ पञकार पप्पु पाटील,माजी जि.प,सदस्य मा. दयानंद कांबळे,मुनाफ टप्पेवाले,माने रमन,पिंटू काळे,डी.ए.कांबळे,पी.एस माने,एल.मोरे.अयाज कुरेशी,आदी जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या