पीडित कुटुंबाने ॲड. आंबेडकर यांची घेतली भेट !
चित्रा न्युज प्रतिनिधी
उस्मानाबाद - शहरातील एका मुलीची काही तरुणांनी छेड केली होती. याचा जाब मुलीच्या भावाने संबंधितांना जाऊन विचारला. त्याचा राग मनात धरून त्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्या भावास एकट्याला गाठून अमानुष मारहाण केली. त्याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य आरोपीसह फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकार सांगितला. व आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी केली.
ॲड. आंबेडकर यांनी सर्व हकीगत ऐकून घेत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे विचारना करीत फरार आरोपींना अटक का केली नाही ? त्यांना अटक करून पुरवणीमध्ये उर्वरित सर्व आरोपींची नावे समाविष्ट करावीत. योग्य पद्धतीने तपास करावा अशा सूचना दिल्या.
ॲड. आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी येथे आले होते. तेव्हा या प्रकरणाविषयी सांगण्यात आले. या प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करण्यासाठी दिरंगाई केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. घटना घडल्यापासून तीन दिवसापर्यंत पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. मात्र, प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून ठेवताच अवघ्या काही क्षणात त्यांनी आरोपींना कसे पकडले ? तसेच पोलिसांनी आरोपींशी संगनमत करून मयत तरुणाचे वडिलांवर खोटी तक्रार देऊन खोटा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ज्या मुलीची छेडछाड केली. त्या पीडित मुलीस शहर पोलीस ठाण्याच्या पुरुष पोलिसाने घटनास्थळी नेऊन दबाव टाकून अतिशय लज्जास्पद वागणूक दिली. विशेष म्हणजे या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला व इतर फरार आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही.
वंचित बहुजन आघाडीचे विकास बनसोडे यांनी इटलकर कुटुंबीयांची ॲड. आंबेडकर यांच्यासोबत भेट घडवुन आणली. यावेळी पीडित तरुणाचे वडील शिवाजी शिमप्पा इटलकर, आई आशा इटलकर, विजय चौगुले, पंडित चौगुले, महादेव इटलकर, सिमप्पा इटलकर, पूजा इटलकर, आरती इटलकर, तनुजा इटलकर, सुमनबाई इटलकर आणि राधा इटलकर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या