Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथील सौ. रुक्मिणी माता माध्यमिक कन्या शाळेत शालेय साहित्य वाटप...


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर  :- परिसरात शैक्षणिक क्षेञात नावलौकिक मिळवलेली उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील मुलींची शाळा म्हणून नामांकित असलेली सौ. रुक्मिणी माता माध्यमिक कन्या विद्यालय येथे वर्ग ५ वी ते वर्ग ८ वी तील सर्व विद्यार्थिनींना वह्या,पेना,पुस्तके हे शालेय साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी संस्थेचे सचिव नारायणराव वाघमारे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता काळे मॅडम तसेच बालाजी नंदाणे सर व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेत येणाऱ्या नवीन प्रवेशधारक विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या