चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-रुग्ण व फार्मासिस्ट यांचे नाते म्हणजे जीव की प्राण असे असते.
कारण,डाॅक्टरने लिहून दिल्यानुसार औषधी फार्मासिस्टने दिले की रुग्ण बरा,अन्यथा रुग्णाच्या जीवाला होतो खतरा !
हे माहिती असूनही हाळी-हंडरगुळी (ता.उदगीर) येथील बहूतांश औषधी {मेडिकल} दुकाणात फार्मासिस्ट नसतातच ! आणि मुनिम दिसतात. मेडिकल मध्ये नेहमी तूच असतोस, तुझा मालक कधीमधीच असतो. तू डि.फार्म.केलास की काय ? असे
एका मेडिकल स्टोर्स मधील एका मुनिमाला विचारलो असता डि.फार्म, बि.फार्म काय नाही केलो.सालगडी म्हणुन आहे.तसेच अमूक कंपनीने ठरवून दिलेल्या वेळात औषधांची विक्री केली की,फार्मासिस्टला टूरवर पाठवत असते.म्हणुन मालक सतत टुरवर आणि मी मेडिकल स्टोर्सवर असतो.अशी माहिती मुनिमांवर दुकाण सोडून सतत टूरवर जाणा-या त्या फार्मासिस्टच्या मुनिमानी दिलीय
हाळी-हंडरगुळी {ता.उदगीर} येथे15 मेडिकल स्टोर्स आहेत.यातील कांही दुकाणात औषधांसोबतच जनरल स्टोर्स व किराणा दुकाणातील माल पण विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून येते पण त्या वस्तूंच्या विक्रीचे लायसंन्स कुठे डकविल्याचे दिसत नाही. म्हणजेच विनापरमीट खोबर तेल, गोळ्या,बिस्कीट,शॅंम्पू,चाॅकलेट्स या सारखा माल सर्रासपणे विकला जात आहे.व याला आर्शिवाद कुणाचा आहे? असा प्रश्न या निमित्ताने सुज्ञ व जाणकार मंडळीतून चर्चेत आहे. नियमानुसार औषधांसाठीचा वेगळा परवाना असतो.आणि काॅस्मेटिक्स व किराणा दुकाणातील गोळ्या , बिस्किटे,चाॅकलेट्स इत्यादी माल विकण्यासाठी वेगळा परवाना असतो.पण येथील दुकाणात असा परवाना नसतानाही मेडिकल्स मध्ये गोळ्या,बिस्किटांसह अन्य साहित्य धुमधडाक्यात विक्री होत असल्याचे आणि फार्मासिस्ट ऐवजी मुनिमच मेडिकल मध्ये बसल्याचे सामान्य जनतेला दिसते.पण संबंधित ड्रग d. i.इन्सपेक्टर महाशयाला दिसत कसे नाही ? का एखाद्याचा बळी गेल्यावर -च ड्रग इन्सपेक्टर D.I.महाशयाला दिसेल का? असे प्रश्न निर्माण होतात
0 टिप्पण्या