चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुका पञकार भवन बांधकाम क्रती समितीचे निमंञक म्हणुन संपादक अर्जून डी.जाधव यांची ३७ पञकार बांधवानी मिळून दि.१७ जुन रोजी ही निवड करण्यात आली.
उदगीर येथे बांधण्यात येत असलेले पञकार भवन हे उत्तम दर्जाचे व्हावे, म्हणुन या कामावर वाॅच ठेवायला पञकार बांधवांची एक क्रती समिती स्थापन करण्यात आली आहे.
कारण,पञकार भवनाचे होणारे काम बोगस होत आहे.म्हणुन याची चौकशी करुन संबंधित ठेकेदार बदलून त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे,आणि भवनाचे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे करावे,अशी मागणी करुनही याकडे संबंधित यंञणा कानाडोळा करत असल्यामुळे दि. १७ रोजी पञकार बांधवांच्यावतीने एक निवेदन उपजिल्हाधिकारी मा. सुशात शिंदे यांना देण्यात आले.व या निवेदनाची दखल घेत दि.२० किंवा २१ रोजी संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिका-यासह पञकार भवनाच्या बांधकामाची पाहणी करणार आहे. अशी माहिती उपस्थित पञकारांना सुशांत शिंदे यांनी दिले आहे.
——————————————
समाजातील अनेकांच्या घरकूला बद्दल तसेच रस्ते,नाली,पुलं आदीं - च्या बोगस बांधकामाविरुध्द लेखणीतून आवाज उठवणा-या पञकारांच्या भवनाचे बांधकाम जर बोगस होत असेलतर शासना मार्फत शहरात व तालुक्यात होत असलेल्या व झालेल्या कामांचे बांधकाम कसे झाले व होत आहे?
तसेच उदगीर येथील पञकारबांधवांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासन कारवाही करेल का?
0 टिप्पण्या