चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथून काही अंतरावर असलेल्या तांडा येथील अजय विजय माडोत वय ३० वर्ष रा. तांडा, भद्रावती हे परिवारासह बाहेरगांवी गेले असता दि.१२/०६/२०२५ चे रात्रौ दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्याचे घराचे मुख्य दरवाज्याचे कडी तोडुन घरातील लोखंडी कपाटातील लॉकर मधील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा एकुण १,३६,०००/- रु. माल चोरुन नेला बाबत दिलेल्या तक्रारीवरुन पोस्टेला अप. क्र.२६६/२०२५ कलम ३३१ (३) (४), ३०५ (अ) भारतीय न्याय संहिता अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता
सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदार व तांत्रिक दृष्टया तपास करुन मिळालेल्या माहितीवरुन आरोपी नामे सोनु रामदास धारावत वय ४० वर्ष रा. बरांज मोकासा तांडा भद्रावती यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरलेले सोन्याचे दागीने किंमत १,३५,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, पोअं खुशाल कावळे, योगेश घाटोळे सर्व पो.स्टे. भद्रावती यांनी केली आहे.
0 टिप्पण्या