Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी संघटनांची शहादा शहरात जोशपूर्ण बाईक रॅली!उद्या शहादा बंद!



 शहादा शहरात आदिवासींचा रूट मार्च!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा :-  दिनांक ११ जून २०२५ रोजी समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदूरबार तर्फे भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना "तीनपाट" असा जातीवाचक शब्दप्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर पोलीस ठाणे शहादा येथे ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल न करीत असल्याविरोधात,ॲस्ट्रासिटी संबंधित गुन्ह्य़ातील आरोपींना पोलीस अटकच करत नसल्याविरोधात,आदिवासींवर वारंवार होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात, ॲस्ट्रासिटी कायदा संरक्षणासाठी दिनांक १२ जून २०२५ रोजीच्या शहादा तालुका बंदच्या अनुषंगाने शहादा शहरात जोशपूर्ण बाईक रॅली काढण्यात आली.
                ही बाईक रॅली क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक शहादा पासून  लोणखेडा चौफूली, मलोणी खेतिया रस्ता ,तूप बाजार ,चावडी चौक ,टाऊन हाॅल ,नगरपरिषद ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,स्टेट बॅन्क ,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शहादा पर्यंत जोरदार घोषणा देत काढण्यात आली.
                     बाईक रॅलीची सुरूवात क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणा देत करण्यात आली.त्यानंतर महात्मा गांधी स्मारकाचेही पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.महात्मा गांधी स्मारकाजवळ  चक्काजाम झाले.नंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण पूजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्प अर्पण करून पूजा करण्यात आली व उद्या दिनांक १२ जून २०२५ रोजी सर्व व्यापारी,दुकानदार  छोटे मोटे व्यावसायिक, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी  बंद पाडून सहकार्य करावे,अनुचित प्रकार घडणार नाही,याची खबरदारी घ्यावी,असे जालीर आवाहन आदिवासी संघटनांमार्फत करण्यात आले आहे.
                  भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, आदिवासींना तीनपाट अशी शिवीगाळ करणारा चंद्रकांत रघुवंशी मूर्दाबाद, आदिवासी विरोधी चंद्रकांत रघुवंशीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे,बिरसा लढा था गोरों से ,हम लढेंगे चोरों से, जो आदिवासींयों की जमीन छिने गा, वो कुत्ते की मौत मरेगा! सरकार हमसे डरती है,पुलीस को आगे करती है! ,आदिवासींच्या जमिनी परत करा,गो बॅक गो बॅक,चंदूभैया गो बॅक ,अशा जोरदार घोषणा देत जोशपूर्ण बाईक रॅली शहादा शहरात काढण्यात आली.
                 या बाईक रॅलीत भारत आदिवासी  संविधान सेना,बिरसा फायटर्स, भारतीय स्वाभीमानी संघ,भीलवंश ग्रूप शहादा या संघटनांसह इतर संघटनांचे हजारों  कार्यकर्ते शामिल झाले.उद्या शहादा बंद आहे.लाखो आदिवासी लोक शहादा येथे रूट मार्च मध्ये शामिल होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या