Ticker

औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीसांचा खास माणूस कामाला!


शिंदेसेना संपवून भाजपसाठी जागा मोकळी करण्यासाठी एमआयएमचे इम्तियाज जलील कामाला ! 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रश्न उपस्थित केला आहे की, “इम्तियाज जलील, आम्हाला ऐकायला मिळालंय की तुम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सतत फोन येतात. हे खरे आहे का?” असं ट्विट केले आहे.

वंचित आघाडीचा आरोप आहे की, इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये शिंदे गटाला संपवून भाजपसाठी राजकीय जागा मोकळी करण्याचं काम करत आहेत. “हे सगळं असदुद्दीन ओवैसी यांना माहिती आहे का? आणि औरंगाबादमधील तुमचे कार्यकर्ते या राजकीय सौद्याबाबत जागरूक आहेत का?” असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

या आरोपांमुळे औरंगाबादमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. एमआयएमकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नुकतेच इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीने जोरदार हल्ला चढवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या