Ticker

6/recent/ticker-posts

पेसा शिक्षक भरतीत पात्र यादीतील २६ उमेदवारांना नियुक्तीपत्र द्या:- बिरसा फायटर्सची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार  : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील सन २०२३-२४ मधील CTET उर्तीर्ण २६  उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्त्या द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,भारतीय स्वाभीमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,सुरेश पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 
                       शासननिर्णयानुसार  राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. तरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पेसा आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी. असे निर्देश असून त्या संबधी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिनांकः १९/०७/२०२४ रोजी पत्र निर्गमित करून दिनांक: २०/०८/२०२४ रोजी पात्रता यादी प्रसिद्ध झाली. त्यापैकी ९३ आणि १२६ उमेदवारांना यापूर्वीच नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत.
                  महाराष्ट्र शासनाच्या पेसा कंत्राटी शिक्षक भरती ०७ जुलै २०२४च्या जहिराती चा अनुषंगाने जिल्हा परिषद नंदुरबार यांनी २६८ पदासाठी निवड व पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली त्या यादीत आमचे २६ उमेदवारांची नावे सुद्धा आलेली आहेत. परंतु आमची भरती करण्यात आली नाही. आम्ही यादीतील २६ उमेदवारांनी २०२२ ची TAIT परीक्षा दिलेली आहे. तसेच पदवी परीक्षा उतीर्ण होण्यापूर्वी दिलेली आहे.
                          तसेच सन २०२२ व त्यापूर्वी डी.एड. व बी.एड. पदवी उतीर्ण झालेले असून केंद्राची पात्रता परीक्षा CTET परीक्षा २०२३-२४ ही पेसा कंत्राटी शिक्षक भरती जाहिरातीच्या आधी उतीर्ण झालेले आहेत. CTET परीक्षा २०२३-२४ मध्ये उतीर्ण झाले. या कारणास्तव आमची शिक्षक सेवक म्हणून भरती झाली नाही. आमची २६ उमेदवारांची शिक्षक भरती साठीची पात्रता बेरोजागाची व हलाखीची परिस्थिती आणि वायोमर्यदा पार होण्याची स्थितीचा विचार करून आम्हा २६ उमेदवारांना या पेसा कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये समावेश करून घ्यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार प्रशासनाकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या