पक्षापेक्षा सामाजिक संघटनेला उमेदवारांची पसंती
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :अक्कलकुवा - अक्राणी या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले प्राध्यापक सा-या पाडवी हे आगामी जिल्हा परिषद नंदूरबारची निवडणूक डाब या गटातून लढणार आहेत. बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून उमेदवारी करण्यास त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.साऱ्या डी. पाडवी हे अक्कलकुवा तालुक्यातील मौजे, वाडीबार येथील मूळ रहिवाशी असून सध्या ते ठाणे - पालघर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालय, वसई येथे प्राध्यापक म्हणून गेल्या १४ वर्षापासून कार्यरत आहे.
शासकिय आदिवासी मुलांचे वसतिगृहातील समस्या, तसेच महाविद्यालयातील व शाळकरी मुलांच्या समस्या सोडवण्यात सा-या पाडवी हे नेहमीच तत्पर असतात. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी - अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील गरीब आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून शिक्षण,आरोग्य,मजुरांचे स्थलांतर सारख्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
बिरसा फायटर्स संघटनेकडून सुशिलकुमार पावरा यांनी नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.त्यानंतर अक्कलकुवा,शहादा व सटाणा अशा ३ विधानसभा मतदारसंघात बिरसा फायटर्स तर्फे उमेदवार लढले.लक्षणीय मते मिळवून अनेक राजकीय पक्ष्यांच्या उमेदवारांना मागे टाकले.दिग्गज नेते व मंत्री यांना पराभूत करण्यात बिरसा फायटर्स उमेदवारांनी किंगमेकरची भूमिका बजावली.त्यामुळे विरोधकांना बिरसा फायटर्सची ताकद माहीत आहे. राज्यात बिरसा फायटर्स संघटनेला मानणारा मोठा सुशिक्षित व युवा वर्ग आहे,उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.सामाजिक कार्य बघून लोक बिरसा फायटर्सच्या उमेदवारांना मतदान करतात. प्राध्यापक सा-या पाडवींसारखा एक दमदार उमेदवार आम्हाला मिळाला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत डाब गटातून आमचा उमेदवार निवडून येईल, याची मला खात्री आहे.५६ पैकी २४ गटातून बिरसा फायटर्सचे उमेदवार जिल्हा परिषद निवडणुक लढणार आहेत. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या