Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस पथके फिरतीवर,तर अवैध धंदे करणारे पळतीवर ..!!


हाळी-हंडरगुळी व वाढवणा येथील चीञ.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:- विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड,लातुर जिल्हा पोलीस प्रमूख,स्था.गु,शाखा तसेच डी.वाय.एस. पी.अहमदपुर-चाकुर यांच्या मार्गदर्शनात व आदेशान्वये नेमलेले स्पेशल पथकांतील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वाढोणा पोलीस हे ही *ग्राउॅंड* वर उतरुन 2 नंबरचे धंदे करणा-यांची धरपकड करीत असल्याचे बघून व तशा न्यूज ऐकूण येथील बहूतांश अवैध धंदे करणारे *अंडर ग्राउॅंड* झाल्याचे म्हणजे गावात दिसतच नाहीत.स्वत: सपोनि.सुनिल गायकवाड  हे.काॅ. संजय दळवे-पाटील, एस.के. रंगवाव,टी.टी. बळदे,पो.काॅ.बालाजी अक्केमोड,गोरख कसबे,दत्ताञ्य वाडकर,दयानंद (सोनु) सोनकांबळे या सहका-यांना सोबत घेऊन वाढवणा व हाळी-हंडरगुळी परिसर राञंदिवस पिंजुन काढत असल्याने गत कांही दिवसामध्ये या ठाण्याच्या हद्दीत लाखोंच्या मुद्येमालासह अवैध धंदे करणा-यांनाही ताब्यात घेतले आहेत.यामुळे बहूतांश अवैध धंदेवाले पळतीवर आणि पोलिस पथक गस्तीवर. असे चिञ हाळी हंडरगुळीत दिसत आहे.
अवैध धंद्यामुळे गुन्हे व गुन्हेगारी वाढते.म्हणुन अवैध धंदे मुळासकट उखडून फेकण्यासाठी वि.पोलीस महानिरिक्षकांच्या आदेशान्वये जि. पोलीस प्रमुख व स्था.गु.शाखाप्रमुख यांनी नेमले पथके या भागात सतत ये-जा करीत असल्यामुळे परिसरात मटका,गुटखा,दारु या सारखे अवैध धंदे करणा-यांमध्ये खाकीवर्दी बद्दल भीती निर्माण झाली आहे.आणि हा परिसर अवैध धंदेमुक्त करण्याचा विडा वाढवणा पोलिसांनी उचलला आहे.म्हणुन वाढवणा पोलीसांसह स्पेशल 'स्काॅड' पण 'ग्राउॅंड' वर आहे म्हणुन पोलिसांच्या *लाठी* चा *प्रसाद* खाण्यापेक्षा आपण शांत बसलेलेच बरे,असे म्हणत कांहीजण काळ्याधंद्यापासून चार हात लांबच आहेत.तेंव्हा जनतेनी अवैध धंद्याची माहिती देऊन सहकार्य करावे. तशी माहिती देईल त्या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल. अशी माहिती सपोनी.सुनिल गायकवाड यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या