Ticker

6/recent/ticker-posts

शाळा,महाविद्यालय परिसरातील टप-यांवर कार्यवाही सुरुच राहील-सपोनि.एस.पी.गायकवाड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-पोलिस अधिक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार दि.११ जुलै रोजी शाळा,महाविद्यालयाच्या १०० मिटर मध्ये असलेल्या हाॅटेल्स, किराणा दुकाण,पान टप-या यांची तपासणी करुन तंबाखुजन्य पदार्थ, गुटखा जप्त केला.त्याच दिवशी वाढवणा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या अनेक शाळा व काॅलेज परिसरात कारवाया करण्यात आल्या असून यात मुद्येमालासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.तरी ही त्याच दिवशी दुपार पासून शाळा, काॅलेज परिसरात असलेल्या तसेच कंपाऊॅंड भिंतीला खेटून असलेल्या टप-या पुर्ववत सुरु असल्याचे कानी पडत आहे.म्हणुन पुन्हा एकदा अशी मोहिम सुरु करुन शाळा व काॅलेज परिसरात १०० मिटरच्या आत जर्दा, सुगंधीत तंबाखु,गुटखा विकणा-या विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.असे दिव्य मराठी जवळ बोलताना वाढवणा ठाण्याचे सपोनि एस.पी. गायकवाड म्हणाले.
सुगंधीत जर्दा,तंबाखु,गुटखा खाणारे व्यक्तींना जिवघेणा रोग होतो.म्हणुन शासनाने करोडोंच्या उत्पन्नावावर पाणी सोडून याचे उत्पादन,विक्री, वाहतूक व साठवणुक करण्यावर बंदी घातली.तसेच शाळा व काॅलेज परिसरात १०० मिटरच्या आत बंदी असलेला गुटखा,सुगंधीत जर्दा विक्री  करण्यावर बंदी घातली आहे.तरीही कांही महाभाग जनहितापेक्षा स्वत:चे हित म्हत्वाचे समजुन गूटखा,तत्सम पदार्थ याची खुलेआमपणे विक्री करत असल्याचे निदर्शनास येताच व याबाबत तक्रारी येताच वरिष्ठांच्या आदेशानुसार लातुर जिल्ह्यात दि.११ जुलै रोजी धडक कार्यवाही करण्यात आली.आणि यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आणि अशीच कार्यवाही वाढवणा पो.स्टे.हद्दीमध्ये करण्यात आली.पण त्यावेळी फोना फोनी झाल्यामुळे शाळा परिसरात गुटखा,सुंगधीत तंबाखु विकणा-या टप-या क्षणार्धात बंद केल्या.म्हणुन कार्यवाही पासून ते टपरीचालक वाचले आहेत.तसेच पोलिस पथक परत जाताच दुस-याक्षणी त्या पान टप-या उघडण्यात आल्याची ओरड सुज्ञ व शिक्षणप्रेमी नागरिकांमधून होत असल्याने याची दखल घेत पुन्हा लवकरच अशी मोहिम हाळी हंडरगुळी,वाढवणा,सुकणी,वडगाव, मोरतळवाडी,चिमाचीवाडी,रुद्रवाडी परिसरात सुरु करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या