चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला :-मंडळातील हिवताप विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना तिसरा लाभ मंजूर करण्याचे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.याबाबत या संघटनेकडून शासन व प्रशासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू आहे. प्रादेशिक व विभागीय स्तरावरिल संबंधित अधिकारी वर्गासोबत वेळोवेळी चर्चा सुद्धा झालेल्या आहेत.तथापी अद्यापही मंडळातील हिवताप कर्मचार्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ मंजूर केलेला नाही.
राज्यातील नाशिक,कोल्हापुर, नागपुर ,लातुर औरंगाबाद या मंडळातील नियमित कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना तिस वर्षे सेवेनंतरचा तिसरा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. तर अकोला विभागातील कर्मचार्यांनाच का नाही? असा प्रश्न पात्र लाभार्थी संघटनेला विचारत आहेत.
सातव्या वेतन आयोगामध्ये शासनाने सेवेतील कर्मचार्यासाठी तीन लाभाच्या योजना मंजूर केलेल्या आहेत. या आयोगामधे पदोन्नत पद व निम्न पदाचे वेतन श्रेणी समान असल्याने या संघटनेचे नेतृत्वाखाली वेतन त्रुटी समितीकडे योग्य मार्गे प्रस्ताव सादर केले.समितीसमोर तीन वेळा सुनावणी झाली. मा. खुल्लर साहेब समितीचे अध्यक्ष यांचे समोर संघटनेचे सरचिटणीस श्री डी. एस. पवार यांनी समर्पक बाजु मांडली. त्यावर त्यांचे समाधान झाले. दि.२जुन २०२५ चे वित्त विभागाचे शासन निर्णयानुसार वेतनश्रेणीमधे सुधारणा करण्यात आली.यामधे आरोग्य कर्मचारी संवर्गास S-9, आरोग्य निरीक्षकS-10,आरोग्य पर्यवेक्षक S-14,व अवैद्यकीय अधिकारी S-15 ही वेतनश्रेणी मंजूर केली आहे. याप्रमाणे सेवेतील कर्मचारी व सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांचे नवीन वेतनश्रेणीप्रमाने फेर वेतन निश्चिती करून त्वरित लाभ अदा करण्यात यावे.
तसेच अकोला मंडळातील आरोग्य कर्मचारी संवर्गामधुन आरोग्य निरीक्षक पदावरील पदोन्नतीचे प्रकरण सुद्धा त्वरित निकाली काढण्यात यावे. अशी या संघटनेची आग्रही मागणी आहे.
या अगोदर दि.19 मार्च 2025 रोजी दु.12 पासून मा. उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला या कार्यालयासमोर पात्र कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण आंदोलनाची नोटीस संबंधितांना देण्यात आली होती. दि. २८/०३/२०२५ रोजी या संघटनेचे शिष्टमंडळा सोबत चर्चा झाली दोन महिन्यात प्रस्तावित प्रकरणे निकाली काढण्याची लेखी शाश्वती संघटनेला दिली. तथापि गेल्या चार महिण्यापासुन ठरल्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे अकोला मंडळातील कर्मचार्यांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत.
कर्मचार्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन अकोला मंडळातील पदोन्नती व तिसर्या लाभास पात्र कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री डी. एस.पवार यांचे नेतृत्वामध्ये मा. उपसंचालक आरोग्य सेवा व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) अकोला यांची सोमवार दि.२१/७/२०२५ ला भेट घेण्याचे ठरले आहे.चर्चेमधे प्रस्तावित मागण्यावर योग्य निर्णय न झाल्यास त्याचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत या आंदोलनामधे अकोला मंडळातील लाभास पात्र कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री. डी.एस.पवार यांनी आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या