विदयार्थ्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : अकलूज येथे दि.०८ व ०९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. यास्पर्धेत सदाशिवराव माने विद्यालयाच्या खेळाडूंनी बहारदार खेळाचे प्रदर्शन करत जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या स्पर्धेकांना पराभूत करत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये १३ खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. या खेळाडूंची पुणे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक उमेश भिंगे,भीमाशंकर पाटील,भीमराव दुधाळ, संजय राऊत या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावलेले खेळाडू पुढील प्रमाणे (कंसात वजनगट)-
*✨ १७ वर्ष वयोगट -*
निहाल शेख (५६), विराज पोमणे (६०), सार्थक काळे (७९), शंभूराजे निंबाळकर (९८), सुजल धडांबे (८८), सानिका जाधव (७७), तृप्ती चव्हाण (७७)
*✨ १९ वर्ष वयोगट-*
पवन पवार(६०), यशराज चव्हाण (७१), सूरज गायकवाड (७९), प्रणव चव्हाण (९८), प्रियांका रास्ते (७७), अस्मिता काळे-पाटील (८६)
या सर्व विजेत्यांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना कठोर परिश्रम, नियमित सराव व क्रीडा शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाले असल्याचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी सांगितले.
या सर्व खेळाडूंच्या उज्वल कामगिरीचे शि.प्र. मंडळ अकलूज संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष मा.श्री.संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, विद्यालयाचे सभापती मा.चि. सयाजीराजे मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव मा.श्री. अभिजित रणवरे, सहसचिव मा.श्री. हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री.अमोल फुले सर, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेस भरघोस शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या