Ticker

6/recent/ticker-posts

दुर्गामातेच्या अश्विन नवरात्र पर्वा साठी मुंडीपारमध्ये महिला कार्यकारिणीची स्थापना

दुर्गा मंदिर दुर्गा चौक येथे उत्साही नियोजन बैठक – महिलांचा मोठा सहभाग


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंडीपार  :ग्राम मुंडीपारमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा संकल्प महिलांनी हाती घेतला आहे. सार्वजनिक दुर्गा मंदिर, दुर्गा चौक मुंडीपार येथे दुर्गामातेच्या आश्विन नवरात्र पर्वासाठी महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
कार्यकारिणी पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

अध्यक्षा – सौ. अनुसयाबाई राहांगडाले.
उपाध्यक्ष – सौ. छायाबाई चौधरी, सौ. ज्योतीबाई दिगंबर राऊत, सौ. शालुबाई बिसेन, सौ. ललिताबाई सोनवाने.
सचिव – सौ. लताबाई चौधरी.
सहसचिव – सौ. ज्योतीबाई ओंकार राऊत.
कोषाध्यक्ष – सौ. पूजाबाई डी. पारधी.
सह-कोषाध्यक्ष – सौ. लक्ष्मीबाई पारधी.
सांस्कृतिक प्रमुख – सौ. पूजाबाई पुरुषोत्तम पारधी.
तसेच इतर सदस्यांचा समाविष्ठ असुन
नियोजनाचे महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आले-
परंपरेनुसार पूजा-अर्चना आणि धार्मिक विधी ,
मंदिर सजावट व स्वच्छता व्यवस्थापन ,
भजन-कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम ,
प्रसाद वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था ,
लहान मुली व महिला यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
व बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने निर्णय घेतला की, “गावातील महिला वर्गाने एकत्र येऊन भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाने पर्व उत्सव पार पाडावा.”
गावकऱ्यांनी या महिला कार्यकारिणीचे स्वागत करत “जय माता दी”च्या जय घोषात उत्सवाचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या