चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र पोलीस मित्र शोषल असोशियन. ( महाराष्ट्र राज्य) वतीने. " मातृभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे! गौरव कर्तव्याचा, सत्कार समाजसेवकाचा! राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी सत्काराच्या कार्यक्रम दिनांक-19 /10/2025 रोज रविवारला 12 ते 5 वाजेपर्यंत स्थळ- भालचंद्र ब्लड बँक, मध्यवर्ती बस स्थानकाच्या मागे, लातूर, येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष- अण्णाराव पाटील ( विधिमंडळाचे अध्यक्ष ) यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून - लातूर जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार - डॉक्टर शिवाजीराव काळगे, ज्येष्ठ पत्रकार - सुभाष घोडके, पत्रकार व्हाईस ऑफ मीडिया - राजेंद्र बारगु डे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष - सुशील चिकटे, सिद्धार्थ कवठे कर, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - सुफी सय्यद शमशुद्दीन ( संस्थापक सचिव) प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, उषा धावारे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी क्रांतिकारी भीम गीत सादर केले. त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ शाल मानाच्या फेटा " कर्तव्यदक्ष आदर्श समाज प्रबोधनकार पुरस्कार -2025 सन्मानित करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक - सदानंद मोरे अकोला, दीपमाला तुपकर, आर, बी, ढगे, सविता भारती, रंजना हासुरे, पूजा भोसले, बाळासाहेब मदाडे, डॉक्टर विकास निलंगेकर, डॉक्टर राम लिंग जावळे, विशाल शिंदे, डॉक्टर रामराव पवार, डॉक्टर बळीराम पवार, डॉक्टर शिवाजी गाडे, अजय पाटील, एडवोकेट गणेश कांबळे, दयानंद काळे, एडवोकेट लक्ष्मण शिंदे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - सुफी सय्यद शमशुद्दीन, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - प्राध्यापक महादेव ग पा ट, यांनी केले, सर्वांचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या