Ticker

6/recent/ticker-posts

कोरपना येथे श्री संत नगाजी महाराज यांची जयंती संपन्न.

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर :-कोरपणा येथील श्री संत सेनाजी व नगाजी महाराज मंडळ, नाभिक समाज कोरोपणाच्या वतीने, कोरपणा येथे दिनांक 27/ 10 /25 ला श्री संत नगाजी महाराज भवन 'येथे श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची जयंती महोत्सव साजरा करण्यात आला .
         यावेळी दिनांक 27/ 10/ 2025 रोज सोमवारला सकाळी:-6 वाजता ग्रामस्वच्छता अभियान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर 7 वाजता सामुदायिक ध्यान करून श्री ची घटस्थापना व संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना करून पूजापाठ व आरती करण्यात आली .त्यानंतर 9 ते 12पर्यंत श्री गुरुदेव भजन मंडळ कोरपना यांचे भजन.    दुपारी 12 वाजता, पंढरीनाथ आंबेकर (वयोवृद्ध कार्यकर्ते) यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत नगाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भाषणे करण्यात आली  यावेळी तुकाराम महाराज जाधव व मिननाथ महाराज पेठकर यांनी श्री संत नगाजी महाराज व संत चरित्रावर प्रकाश टाकून आपले विचार व्यक्त केले. यावेळी पुंडलिक कडुकर, बोरगाव, अर्जुन हनुमंते येरगव्हाण , रामदासजी  गौरकार, श्री संत नगाजी महाराज कमिटीचे अध्यक्ष,दिलीप भाऊ राजूरकर, सलून असोसिएशन कोरपणाचे अध्यक्ष- किशोर बनसोड, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत सेनाजी व नगाजी महाराज मंडळ नाभिक समाज कोरपनाचे अध्यक्ष- रमेशभाऊ घुमे यांनी केले, तर संचालन पांडुरंग उंबरकर यांनी केले.
       दुपारी :-1 वाजता मिननाथ महाराज पेटकर यांच्या हस्ते दहीहंडी काला करण्यात आला. यावेळी सदर कार्यक्रमाला  विजयराव बावने (संचालक CDCC बॅंक ) यांनी वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दर्शविली व कार्यक्रमाची शोभा वाढविली. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला वरील संपूर्ण कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी कोरपणा येथील श्री संत सेनाजी व नगाजी महाराज मंडळ, श्री संत नगाजी महाराज कमिटी व सलुन असोसिएशन कोरपणा यांच्या संपूर्ण नाभिक समाजाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन कार्यक्रम पार पाडला.
       सदर कार्यक्रमाला भारत पंदीलवार, मारुती मांडवकर, सचिन पंदीलवार, संदीप हनुमंते सुरेश खोबरकर, प्रफुल नक्षणे, शंकर चौधरी, कडूजी खोबरकर, नथुभाऊ चौधरी ,योगेश हनुमंते, भोलेश चौधरी, गणेश मांडवकर सचिन बोमपल्लीवार इत्यादी अनेक नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केले. 
         सायंकाळी सात वाजता सामुदायिक प्रार्थना व राष्ट्र वंदणा घेऊन कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम करन्यात आला. यावेळी श्री संत सेनाजी व नगाजी महाराज मंडळ, नाभिक समाज कोरपनाचे अध्यक्ष-  रमेश पां घूमे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या