Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती येथे साहित्यिक व कला कार्यक्रमाचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : स्थानिक साईप्रकाश बहुउद्देशीय कला व शिक्षण संस्था भद्रावती द्वारा ‘प्रिय शालिकदा..स’ या संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता, जय गुरुदेव लॉन, बंगाली कॅम्प रोड, भद्रावती येथे आयोजिला जात आहे.

माझी मुख्याध्यापक तथा बालमित्र व साहित्यिक शालिक दानव यांना १९८३ ते आजतागायत आलेल्या बालमित्रांच्या १५२ भावनिक पत्रांचा संग्रह संपादित रूपात 'प्रिय शालिकदा..स' ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत असून याकरिता प्रमुख अतिथी नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकेतील बालकलाकार आरुष देवळेकर, मुंबई, हेमा बहादे, सूत्रसंचालिका- आकाशवाणी, चंद्रपूर. गझलकार प्रवीण आडेकर, संयोजक- स्मृतीगंध प्रतिष्ठान हे राहणार असून अध्यक्षस्थानी प्राध्यापक धनराज आस्वले, रवींद्र शिंदे चारिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर हे राहणार आहेत तर भाष्यकार म्हणून प्रदीप देशमुख -ज्येष्ठ साहित्यिक, चंद्रपूर राहणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे शालिक दानव यांना ज्या बालकांनी त्या काळात विविध गावा- शहरातून पत्रे पाठवली ते युवक देखील  उपस्थित राहणार आहेत.
    
पुस्तक प्रकाशनानंतर बाल अभिनेता आरुष याची 'मी असा घडतोय’ या सदराखाली बालकुमार फन अँड लर्न च्या बालकांनी घेतलेली खुमासदार मुलाखत व त्यानंतर 'आम्ही कवितेतून बोलू' हा बालकवी संमेलनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे साईप्रकाश कला अकादमीच्या बालकांचे कला प्रदर्शन. बालकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे दिवाळीचा फराळच ठरणार आहे, तेव्हा कार्यक्रमास बालमंडळी, कला व  साहित्यिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साईप्रकाश कला अकादमी, झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती, श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, विदर्भ साहित्य संघ भद्रावती, बालकुमार फन अँड लर्न भद्रावतीच्या सदस्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या