आमदाराचा स्वीय सहाय्यक सांगुन वाहन चालकाची हॉटेल मालकास धमकी
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नागपूर -चंद्रपूर मार्गावरील टाकली गावाजवळ निखिल मांडवकर या युवकाने नुकतेच हॉटेल भाड्याने करून आपला व्यवसाय थाटला आहे .या हॉटेल वर दि. 18 ऑक्टोंबरला रात्री 08-30 च्या दरम्यान आम्ही आमदार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून एक दारुड्या जेवण करण्यासाठीं आला हॉटेल मालकाने त्याला सन्मानजनक बसण्यासाठी खुर्ची दिली मात्र दारुड्या त्यांच्या आपले सरकार या उद्देशाने मालकाचा टेबल हिसकावून दादागिरीने त्यावर विश्राम करायला लागला हॉटेल मालकाने हटकल्याने त्यांनी भावंडं यांना फोन करून आमचे सरकार आहे.असे म्हणत हॉटेल मध्ये धिंगाणा घातला.हा दारुड्या एवढ्यावरच न थांबता आम्ही आमदाराचे माणसं आमचे कोणी काय करणार असे म्हणत आमदाराच्या वाहन चालकाने स्वीय सहाय्यक बनून केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आमचे कोण काय बिघडविणार अशी धमकी हॉटेल चालकाला दिली.यावरून सत्ताधारी आमदाराच्या चालकाची दादागिरी समोर आली आहे.
हॉटेल व्यावसायिक निखिल मांडवकर यांनी पोलिसात ऑनलाइन तक्रात दाखल केली आहे.या घटनेमुळे सत्ताधारी आमदाराच्या कार्यकर्त्यांची दादागिरी समोर आली आहे. हॉटेल व्यावसायिकांना धमकावणारे हे दारुडे कार्यकर्ते जनसामान्य माणसाला किती त्रास देत असेल हे यावरून बघण्यासारखे आहे. वरोरा - भद्रावती विधानसभेत एक तरुण आणि संयमी व उच्चशिक्षित युवक म्हणून येथील जनतेने आमदार करण देवतळे यांना विजय केले. मात्र त्यांचेच वाहन चालक दादागिरीची भाषा करून हॉटेल व्यावसायिक यांना त्रास देण्याचे काम करत आहे. या संबंधात हॉटेल व्यवसाय यांनी आमदार करण देवतळे यांच्याकडे त्या वाहन चालकाची तक्रार केल्याची समजते. मात्र यावर आमदार करण देवतळे काय निर्णय देतील हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.


0 टिप्पण्या