चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :- रामटेक तालुक्यातील किरणापुर ( काचु र वा ही ) येथील नवयुवक उत्सव मंडळ किरणापुर तालुका रामटेक दिवाळीच्या व कार्तिक पौर्णिमेच्या औचित्य साधून भव्य मंडळ उत्सव व जंगी दुय्यम खडा तमाशा चा कार्यक्रम शाहीर ब्रह्माजी नवघरे विरुद्ध शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांच्या दुय्यम जंगी मुकाबला दिनांक-29/10/2025 रोज बुधवार ला सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत, रात्री सायंकाळी नऊ वाजेपासून चंद्रा लावणी डान्स ग्रुप भंडारा यांच्या रेकॉर्डिंग डान्स स्थळ- जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक - ग्रामपंचायत किरणापुर सरपंच - श्री किसन उईके यांच्या हस्ते पार पडला, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - आकाश झेप फाउंडेशन रामटेक साक्षोधन कडबे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वांदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुथे, ग्रामपंचायत माजी सरपंच ज्ञानेश्वर ठाकरे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - स्वप्निल हुड, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, शेष राज कथे, रवींद्र कडू, श्याम कडू, सोपाक कडबे, पोलीस पाटील भोजराज वानखेडे, दिनेश घरजाडे, शुभम कुथे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या