चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सरकारी- निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती तर्फे ११ नोव्हेंबर २०२५ ला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता मात्र या संपास तूर्तास स्थगिती देण्यात आली. सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्यात अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकामी प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यासाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामासाठी आणि ६ नोव्हेंबर २५ पासून आचारसंहिता सुरू झाली असल्याने संप करणे अवघड आहे. ही स्थिती लक्षात घेऊन दि. ५ नोव्हेंबर २०२५ ला नाशिक येथे समन्वय समितीचे निमंत्रक मा श्री विश्वास काटकर,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष मा. अशोक दगडे यांचे उपस्थितीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पुकारलेला संप तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक व स्पष्टीकरणात्मक सूचना प्रसिद्ध करने, कंत्राटी रोजंदारी व अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना एक वेळची बाब म्हणून सेवेत सामावून घेणे, सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यावर मा. मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यातून एकदा चर्चा सत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे, सेवानिवृत्ती चे वय 60 करावे, व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत प्रविष्ट झालेल्या कर्मचारी- शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शासन सेवेतील रित्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, शिक्षकांवरील अन्यायकारक १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन आदेशावर पुनर्विचार करण्यात यावा, नवीन राष्ट्रीय धोरणांवर पुनर्विचार करण्यात यावा, यासह इतर प्रमुख मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ११नोव्हेंबर २०२५ रोजी भोजन अवकाशात आप आपल्या कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय एकमताने झाला. या निदर्शनाची शासनाने दखल न घेतल्यास हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा निर्णयही सभेत झाला आहे
मध्यवर्ती संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार आचारसंहिता सुरू झाली असल्याने अमरावती जिल्ह्यातील कर्मचार्यांनी दि. ११ नोव्हेंबर २५ दुपारी २ ते ३ या भोजन अवकाश काळात आप आपले कार्यालयासमोर निदर्शने करून प्रलंबित मागण्याच्या घोषणा द्याव्यात.दुपारी ३ वाजता समन्वय समितीचे पदाधिकारी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना मा. जिल्हाधिकारी अमरावती यांचेमार्फत मागण्याचे निवेदन देणार आहेत तरी सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने करून अहवाल जिल्हा संघटनेकडे फोटोसह पाठवावा.असे आवाहन समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक श्री. डी.एस.पवार, राज्य सरकारी कर्मचारी संघटना अमरावती चे अध्यक्ष श्री एच. बी. घोम उपाध्यक्ष, श्री विजय सावरकर विभागीय सहसचिव, उपाध्यक्ष श्रीमती वर्षाताई पागोटे,कोषाध्यक्ष एस.डी कपाळे, सुरेश शिर्के,भास्कर रिठे, गोपाल देशपांडे, अनिल मानकर, नामदेव, आर एस.राऊत ,नामदेव गडलिंग,दिलीप मेश्राम, डी. एम. डावरे, नरेंद्र बोबडे,श्री डी.जी सोनवणे,श्री शैलेश लिंंगोट, खान आदी पदाधिकारी यांनी केले.


0 टिप्पण्या