चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-योगाचा कार्य व प्रचार_प्रसार प्रत्येक घरात पोहोचावा हे उद्देश्य समोर ठेवून योग भारती बहुउद्देशीय संस्था ( संभाजी योग उद्यान) भंडारा ची नुकतीच योग्यरीत्या नोंदणी करून योग भारती संस्थेच्या कार्यकारिणीची सौ.अर्चना मते यांचे न्यू शृंगार जवळ,बजरंग चौक,भंडारा निवास स्थानी आयोजित सभेत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली,ज्या मध्ये अध्यक्ष म्हणून शाम मार्कण्ड कुकडे,उपाध्यक्ष_अतुल श्यामसुंदर वर्मा,सचिव_आत्माराम राजाराम बेदरकर, सहसचिव_मो.सईद दोस्तमोहम्मद शेख, कोषाध्यक्ष _विट्ठलराव कवडुजी सेलोकर,सदस्य_ चिंधु गोविंदा बुधे,सदस्य_अनिल नामदेवराव शेंडे,सदस्य_पुरुषोत्तम गोपीचंद साकुरे,सदस्य_संजय उत्तमराव मोहतुरे,सदस्य_सौ.वनिता राजेंद्र देशमुख,सदस्य_अर्चना अमृतराव मते ई. पदाधिकारी व सभासदांचा
समावेश आहे.योगाचे कार्य,प्रचार_प्रसारकरिता पंजीबद्ध करण्यात आलेली भंडारा येथिल ही प्रथम संस्था आहे।
१२/१२/२०२५ ला सेवानिवृत जिल्हा परिषद कर्मचार्यांचे स्नेह_मिलन कार्यक्रमाचे औचित्य साधून दि:१३/१२/२०२५ ते १५/१२/२०२५ वेळ:सकाळी ६.०० ते ७.०० पर्यंत विशेष योग शिबिराचे आयोजन शिवार्पण टॉवर ,राजीव गांधी चौक भंडारा येथे करण्याचे योगभारती च्या सभे मध्ये ठराव पास करण्यात आले असून प्रमुख योग शिक्षक श्री शाम कुकडे यांचे कुशल मार्गदर्शनात हे शिबिर होणार आहे.


0 टिप्पण्या