चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : हनुमान मंदिर उत्सव समिती किल्ला वार्ड ,विठ्ठल मंदिर चौक ,भद्रावती तर्फे श्री संतमूर्ती स्थापना दिना निमित्त 30 ऑक्टोंबरला श्री संत मूर्ती पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मंदिरापासून शिवलिंग, श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज मूर्तींची पालखी काढण्यात आली. तर 31 ला सकाळी नऊ वाजता मूर्ती अभिषेक, दहा वाजता होम हवन व आरती , सायंकाळी सहा वाजता संगीतमय सुंदर कांड व सात वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ओम हवनाच्या पूजेला हनुमान समिती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, जान्हवी शिंदे, नकुल शिंदे बसले होते. पौरोहित्य विनायक महालक्ष्मी यांनी केले.
संगीतमय सुंदर कांडाच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे भाविक अगदी तल्लीन झाले होते . याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे व संचालक जयंती टेमुर्डे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यानंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, नकुल शिंदे ,संदीप उपलंचीवर , प्रसाद वेलफुलवार , रजत शिंदे, अक्षय शिंदे, प्रवीण मित- रजत शिंदे - अक्षय शिंदे - अनिरुद्ध महालक्षमे - अनिरुद्ध डभारे - दीपक पारधे - संदीप कल्ले - प्रशांत बेलफूलवार - बालू ताठे - रमेश गुंडावार - अमोल शिंदे - प्रवीण पारधे - सचिन बेलफूलवार - कुणाल चौधरी - पप्पू उपलंचीवार - लुकेश बोरकर - विशाल चटपल्लीवार - युवराज खामणकर व मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते.


0 टिप्पण्या