चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :- शहरानंतर तालुक्यात मोठी बाजारपेठेचे व आठवडी बाजारचे गाव असलेल्या हंडरगुळी येथील ग्रा. पंचायत कार्यालयासमोरील मैदानास वाहनतळाचे स्वरुप आल्याचे गावचे व परगावचे लोकांना दिसते.यामुळे येथे वेड्या-वाकड्या उभा केलेल्या गाड्यांमधून पोलीसांसह अन्य गाड्यांना व पायी ये-जा करणा-या वयस्कर,अपंग महिला-पुरुषांना तारेवरची कसरत करावी लागते.पण या मैदानालगतच पोलीस चौकी असून सुध्दा या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरात वाकडी, तिकडी वाहने उभा करायची स्पर्धाच वाहनधारकांमध्ये लागल्याचे दिसते. उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे अनेक ठिकाणी वाहतूकीला अडचण होईल,अशा प्रकारे शेकडो वाहने बेशिस्तीत उभा असतात.माञ,अशा वाहनांवर आजवर कारवाई करायची डेअरींग कुणीच दाखविली नसल्याने येथे अनेक ठिकाणी विशेष करुन राज्यमार्गावर व ग्रा.पं.समोर शेकडो लहान-मोठी वाहने बेशिस्तीत पार्क केल्याचे दिसतात.यामुळे येथे नेहमी ट्रॅफीक जॅम होते.विशेषत: रविवार आठवडी बाजार दिवशी दिवसातून ४पाच वेळा ट्रॅफीक जॅम होत असते. असे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. परिणामी अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस दलाचे कणखर जिल्हा पोलीस प्रमुक श्री. अमोलजी तांबे यांनीच आता यावर काय तो निर्णय घ्यावा.अशी अपेक्षा आमआदमीमधून व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या