Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी येथील अल्पवयीन चालकांकडून


"कायद्याच्या आयचा घो !"


एका बाईकवर ४,४ जण बसतात..!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर :- शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे भौगोलिक क्षेञ तसेच नांदेड ते बिदर या राज्यमार्गावर असलेल्या हाळी-हंडरगुळी या २ गावामध्ये गत कांही दिवसापासून अल्पवयीन पोरं वाहने वायुवेगाने चालवत असल्याचे जनतेला दिसते.पण यावर कारवाई करणा-यांना दिसत नसल्याने कांही अल्पवयीन चालक *कायद्याच्या आयचा घो..!* असे म्हणत एका बाईकवर चार४ जण बसून कटा मारत बाईक चालवताना दिसतात. लातुर जिल्ह्यातील अमूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतक्या वाहनांवर कारवाई केली.आणि लाखो रुपये दंड केला.अशा बातम्या नेहमीच येत असतात.माञ,या ठिकाणी आजवर एकाही अल्पवयीन चालकावर अण् त्याच्या पालकावर कारवाई केल्याचे वाचण्यात व बघण्यात येत नसल्याने आमचे गाव लातुर जिल्ह्यात नाही का?असा सवाल हाळी-हंडरगुळी मधील नागरीकांमधून चर्चीला जातो. नांदेड-बिदर(उदगीर-अहमदपुर)कडे जाणा-या रोडवर तसेच बाजारपेठेत आणि गल्लीबोळात अल्पवयीन पोरं ट्रीपल,चोबल सीट बसून वायुवेगाने बाईक चालवताना रोजच दिसतात.  अशा चालकांकडून धडधडीतपणे कायदा पायदळी तुडवत असल्याचे संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि जनता या सगळ्यांना दिसते. पण 
मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कुणी? असे म्हणुन गप्पगार बसतात.अद्याप कसलीही कारवाई झाली नसल्याने पालक मंडळी मोठ्या रुबाबात पोरांना की देतात.आणि त्याच्या पाठीमागे शान से बसल्याचे दिसते.येथील बहूतांश रोडवर शेकडो अल्पवयीन पोरं गाडी सुसाटपणे दामटवत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.  अनेकजण परवाना,नंबर प्लेट नसले तरीही ट्रीपल,चोबल सीट बाईक धूम स्टाईल बिनधास्तपणे फोनवर बोलत चालवताना दिसतात.तेंव्हा अशा वाहनधारकांवर कारवाई करुन कायदा अभी जिंन्दा है,हे दाखवायचे धाडस करणार कोण?याकडे हाळी परिसराचे लक्ष लागले आहे.
येथे नंबर प्लेट नसलेल्या असंख्य बाईक असून या पैकी कांही बाईक्स चोरीच्या सुध्दा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असलेल्या येथील शंभो महादेव मंदीरात दर्शनासाठी ये,जा करणा-या महिला-पुरुष व अपंग भाविकांच्या जिवीताला अशा चालकांमुळे धोका निर्माण झालाय. कारण,मंदीरासमोरील रोडवरुन पोरं अतिजलदगतीने फटफटी चालवतात तेंव्हा प्रशासनाने कारवाई करायची डेअरींग दाखवावी असे मत बालाजी सावकार यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या