Ticker

6/recent/ticker-posts

वाहनांच्या वेगावरील नियंञणासाठी रिफ्लेक्टर बसवा हाळी-हंडरगुळीकरांची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-हाळी-हंडरगुळी येथील बेफाम वाहन चालकांवर विशेष करुन अल्पवयीन वाहन चालकांवर आजवर कुणीही कारवाई करायचे धाडस दाखविले नसल्याने येथे वेगमर्यादेचे उल्लंघन करुन वाहने चालविले जाते.म्हणुन वाहनधारकांमध्ये रेस वगैरे लागली की काय?असा प्रश्न जनतेला पडतोय.तसेच हायस्पीडने पळणा-या गाड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असलीतरीही संबंधित यंञणेला याचे सोयरसुतक दिसत नसल्याने  या २ गावातून गेलेल्या नांदेड-बिदर या अंतरराज्य मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंञणासाठी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने रिफ्लेक्टर बसवावेत.अशी मागणी जनतेतून होत आहे.
या रोडवर एक पण गतिरोधक नाही. म्हणुन या मार्गावर वाहनचालकांच्या मनावर विशेषत: अल्पवयीन वाहन चालकांच्या मनावर कसलेच कंट्रोल नसते.म्हणुन अल्पवयीन असलेले चालक गाड्या जास्त वेगाने चालवत असल्याने अधून-मधून लहान-मोठे अपघात होताना दिसतात.म्हणुन बसस्थानक,जि.प.शाळेचे जुने गेट, शिवाजी विद्यालय,वडगाव काॅर्नर इ. ठिकाणी किमान ४ ते ५ गतिरोधक तयार करणे गरजेचे आहे.अशी मागणी या गावभागातील जनतेतून होत आहे.
हाळी-हंडरगुळी या २ गावातून गेलेल्या अंतरराज्य मार्गालगतच शाळा,काॅलेज,२ बाजारपेठा,ग्रा.पं.पोलीस चौकी,तलाठी, बॅंका,बसथांबे,हाॅटेल या सारखे शासकीय- निमशासकीय कार्यालये असून महिला व विद्यार्थ्यांसह५०,६० गावच्या जनतेची व वाहनांची नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. तसेच हा मार्ग ओलांडेस्तोवर लहान मुले,जेष्ठ व अपंग महिला,पुरुष यांच्या जीवात जीव नसतोच..!
कारण,हा रोड नवीन,टकाटक बनवला असला तरीही या रोडवर गरजेचे असूनही रिफ्लेक्टर( गतिरोधक)बसवले नाहीत. म्हणुनच या रोडवरुन दररोज हजारो वाहने सुसाटपणे धावतात. 
विशेष करुन मिसुरडंही न फुटलेले शेकडो पोरं लहान,मोठी गाडी अति जास्त वेगात व कटा मारत चालवत असतात.म्हणुन अनेकांचा जीव टांगणीला असल्याचे समजते.
पण संबंधित खाते व त्यांच्या लोकांना अल्पवयीन चालकांची धूम स्टाईल स्टंटबाजी दिसत नाही.याचेच नवल वाटते.
केवळ गतिरोधकांचा अभाव तसेच अल्पवयीन चालकांवर कारवाई करायची धमक संबंधित यंञणेमध्ये नसल्यानेच या रोडवर कधीही मोठा अपघात होऊ शकतो. मगच संबंधित यंञणेचे डोळे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेंव्हा तात्काळ येथे गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या