चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व फेमस गाव आणि बाजारपेठ असलेल्या हाळी व हंडरगुळी येथे कारवाईचा व जनजाग्रतीचा अभाव असल्यामुळेच बंदी व विक्री हा गुन्हा असलेल्या कॅरिबॅगचा विक्रमी वापर व विक्री होताना दिसत आहे. शासनाने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापर व विक्रीवर बंदी आणुन कित्येक वर्ष झाले.तरी अद्यापही येथे कारवाईचे धाडस कुणीच दाखविले नसल्यानेच कॅरीबॅग विक्रीची आठवडी उलाढाल लाखोंच्या घरात गेली आहे.
या ठिकाणी नगरपरिषद किंवा नगर पंचायत नाही.तर ग्रामपंचायत आहे. म्हणुनच येथे कॅरिबॅग विक्रेत्यांवर व वापरावर कारवाई करणारी कसलीच यंञणा नाही.म्हणुन येथे कॅरिबॅगची विक्री व ढिगारा जागो जागी दिसून येत आहे.तेंव्हा आता जिल्हास्तरीय प्रशासनाने याचा गांर्भीयाने विचार करायला पाहीजे.
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे निर्सग,मनुष्य व पशू यांचे होणारे नुकसान याबद्दल फक्त शहरी भागात प्रशासन व सामाजिक सेवाभावी संस्था यांच्याद्वारे जनजाग्रती केली जाते.प्रशासन,सामाजिक,सेवाभावी संस्था नसलेल्या (असतील तर कागदावरच असतील..!) हाळी-हंडरगुळी येथे माञ केवळ जनजाग्रती व कारवाई अभावी बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या,कॅरीबॅग विक्री करणा-या १० होलसेल विक्रेत्यांची दुकाणदारी जोमात चालत असल्याचे दिसते.आणि संबंधित यंञणा कोमात गेल्याचे बोलले जाते.
येथील व परिसरातील हाॅटेल,किराना फळभाजी,बेकरी,भेळ,यासारख्या छोटछोट्या व्यावसायीकांना हाळी व हंडरगुळीतील किराणा,स्टेशनरी असे १० दुकाणदार बंदी तसेच गुन्हा असलेल्या कॅरिबॅगचे बंडल्स (पोते) विक्री करुन मोठ मोठे बनले आहेत. कारवाई करायचे धैर्य्य संबंधित प्रशासनात नसल्यानेच हैद्राबाद, उदगीर व लातूर येथून आणुन विकतात.असे एका होलसेल विक्रेत्याने नाव गुप्त ठेवा.या अटीवर सांगितले आहे.तेंव्हा संबंधित यंञणा आणखी किती वर्ष झोपा काढणार आहे?याकडे सुज्ञांचे लक्ष आहे.


0 टिप्पण्या