Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक डिसेंबरला जामखेड येथे जाहीर सभेचे आयोजन ;भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615


जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पद व नगरसेवकांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा जामखेड मधील दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता  भक्तीशक्ती मराठी शाळेच्या पाठीमागे पार पडणार आहे.
        या सभेमुळे जामखेड शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.सभेसाठी मोठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे. जामखेड तालुक्याचे भूमीपुत्र व विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपरिषद फडकवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यानुसार संघटनात्मक बैठका,प्रचार योजना आणि उमेदवारांची जनतेशी संवाद अशा उपायोजना वेगाने राबविल्या जात आहेत.
       प्रा.राम शिंदे यांनी नगरपरिषदेची निवडणुक ही गांभीर्याने घेतल्याने थेट मुख्यमंत्री जामखेड मध्ये येत असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
         जामखेडच्या या सभेची चर्चा आणि उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.शेवटच्या टप्प्यात निवडणुकीच्या सर्व तयारीला वेग आला असून विविध समित्या, आघाड्या आणि पक्ष निरीक्षक नेमलेले कार्यकर्ते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा यशस्वी करण्यासाठी नियोजन व संपूर्ण व्यवस्थित जबाबदारी सांभाळत आहेत.जामखेडकरांसाठी फडवणीस साहेबांची सभा ही आगामी काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासाला व अनेक योजनांना निधी देण्यासंदर्भात दिशादर्शक ठरणार असल्याची भावना जनसामान्यातून व्यक्त होत असून नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला निश्चित गती मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.या सर्व प्रयत्नांना बळ देण्यासाठी महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरपरिषदेसाठी विकास आगामी काळात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भूमिका मांडणार आहेत.
      सभेला विविध पक्षनिष्ठ कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला,युवा वर्ग जामखेडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशा प्रकारे भाजपकडून नियोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेवटच्या टप्प्यातील सभेमुळे भाजपाच्या बहुमताच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या