Ticker

6/recent/ticker-posts

अकलूज नगरपरिषद प्रथच होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-अकलूज नगरपरिषद स्थापनेनंतर प्रथमच निवडणुका होत असून निवडणूकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. नगर परिषदेच्या सभागृहात अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक असे १३ आणि नगराध्यक्ष पदासाठी एक असे एकूण १४ टेबलची व्यवस्था केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने नगर परिषदेच्या इमारतीत स्वागत कक्षाशेजारी इच्छुक उमेदवार यांना लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्याची सोय केली आहे.तर वरच्या मजल्यावर प्रत्येक प्रभागासाठी एक स्वतंत्र टेबल,तसेच एक नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली आहे.याठिकाणी इच्छुक उमेदवार यांचेकडून आवश्यक कागदपत्रांची पाहणी करून अनामत रक्कम सर्वसाधारण जागेसाठी २००० तर राखीव जागेसाठी १००० रुपये रोख स्वीकारून पावती देण्यात येणार आहे.  दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी कोणीही आले नाही कार्यालयात फक्त अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी सुमारे १२ तर प्रत्येक नगरसेवक पदासाठी आठ ते दहा जण इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या