Ticker

6/recent/ticker-posts

११ नोव्हेंबर २५ रोजी कर्मचारी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमदार निदर्शने

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व  सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे आवाहना नुसार राज्यातील  सरकारी कर्मचारी आणि शिक्षकाच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यासाठी  आज मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 ला  दुपारी 2  वाजता भोजनाचे सुट्टीत अमरावती जिल्ह्यातील  कर्मचारी- शिक्षकांनी  आपापल्या कार्यालयासमोर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  तीव्र निदर्शने केली आहेत.घोषनांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.शासनाने याची दखल घेऊन संघटनेने प्रस्तावित केलेल्या मागण्या त्वरित निकाली  काढून कर्मचारी व शिक्षकांना दिलासा द्यावा.  यामध्ये PFRDA कायदा रद्द करून सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी,सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनाचे योजनेची अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक व स्पष्टीकरणात्मक सूचना प्रसिद्ध करणे, कंत्राटी रोजंदारी व अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना एक वेळची बाब म्हणून सेवेत सामावून घेणे, सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यावर मा. मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यातुन एकदा चर्चासत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे,सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात यावे, व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करण्यात यावी, १ नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत प्रविष्ट झालेल्या कर्मचारी शिक्षक यांना जुनी पेन्शन लागू करणे, शासन सेवेतील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, 
शिक्षकावरील अन्यायकारक 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन आदेशावर पुनर्विचार करण्यात यावा, नवीन राष्ट्रीय धोरणावर पुनर्विचार करण्यात यावा या प्रमुख  मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  आप आपल्या  कार्यालयासमोर दमदारपणे  निदर्शने केली. याची दखल घेऊन शासनाने वेळीच मागण्यांवर योग्य निर्णय न घेतल्यास    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा इशाराही आजच्या आंदोलनात देण्यात आला. 
       प्रस्तावित मागण्याचे निवेदन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यासाठी अमरावती जिल्हाचे जिल्हाधिकारी यांना  समन्वय समितीचे निमंत्रक श्री डी एस पवार यांचे नेतृत्वात  निवेदन दिले. शिष्टमंडळामधे   राज्य सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा अमरावती व समन्वय समितीचे पदाधिकारी अध्यक्ष  श्री.एच.बी.घोम, एस.डी.कपाळे, एस. डब्ल्यू.शिर्के, भास्कर रिठे, वर्षाताई पागोटे,अनिल मानकर, गोपाल देशपांडे, दिलीप मेश्राम, सचिन गायकवाड, प्रकाश दातीर,डी.जी.सोनोने, शैलेश लिंंगोट, अली खान आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
          

      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या