Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समाज . सेवेचा एक आदर्श


देवानंद,स्वप्निल,नागेश्वर,शंकर व अतुल नन्नावरे ठरले प्रेरणादायी रक्तदाते ! 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती - रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेतून चंदनखेड्यातील देवानंद दोडके  स्वप्निल दडमल , नागेश्वर चौधरी,शंकर दडमल व सालोरी येथील अतुल नन्नावरे या तरुणांनी रक्तदान करून समाजातील युवकांसामोर एक आदर्श व प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.केवळ भाषणामध्ये नव्हे तर कृतीतून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी 'रक्तदान म्हणजेच जिवनदान 'हे तत्व सिद्ध केले.रक्तदाते
आशिष हनवते  यांचा एक खणखणारा फोन व चारही तरुणांनी जश्या अवस्थेत आहे त्याच परिस्थितीत सोबत  कस्तुरबा हाॅस्पिटल सेवाग्राम  येथील ब्लड बँक मध्ये येवून रक्तदान करून डेंग्यू रुग्णांस मोलाचे योगदान केले.
हे चारही युवा केवळ शिबिरापुरते मर्यादित राहत नाहीत.तर गरज पडल्यास तात्काळ हाॅस्पिटल मध्ये जाऊनही रक्तदानासाठी तत्पर असतात.त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले असुन त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे संपूर्ण चंदनखेडा परिसरातुन कौतुक केले जात आहे. आशिष हनवते यांच्या प्रेरणेने अनेक मित्रांनीही नियमित रक्तदान सुरु केले आहे.सामाजिक कार्याची ही साखळी अधिक बळकट व्हावी यासाठी ते सातत्याने युवकांमध्ये जनजागृती करुन रक्तदान शिबीर आयोजित करत असतात.येत्या ६ नोव्हेंबर २०२५ ला चंदनखेडा परिसरातील  माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल रामकृष्ण हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करून देशसेवा करण्यासाठी मोलाचे योगदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.आशिष हनवते यांचे कार्य हे केवळ समाजासाठीच नव्हे तर तरुणांसाठीही एक प्रेरणादायी आहे.अशा व्यक्तीमत्वामुळेच समाजात सेवा, स्नेह आणि समर्पणाची भावना वाढीस लागते.हे तेवढेच खरे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या