चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :-तालुक्यात जि.प.व पं.स.गट व गणाच्या निवडणुकीची इच्छूकांनी तयारी सुरु केली असलीतरी वाढोणा गटात महायुतीकडून रा.काॅं.पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाचे पदाधिकारी तथा हाळी ग्रा.पंचायतचे विरोधी गट प्रमूख ख्वाजाभाई तांबोळी यांना मतदारातून पहिली पसंती मिळत असल्याने ख्वाजाभाई यांचे पारडे जड असल्याचे समजते.
तांबोळी यांचे वडील स्व.शमशोद्दीन तांबोळी हे उपसरपंच आणि माजी मंञी बाळासाहेब जाधव यांच्याशी एकनिष्ठ होते.त्यांच्या पश्चात त्यांचे पुञ ख्वाजाभाई हे पण सहकारमंञी बाबासाहेब पाटील,माञीमंञीजाधव यांच्यासह दादा गटाशी एकनिष्ठच आहेत.तसेच समाज कार्यात सतत आघाडीवर असतात म्हणुन पक्षातील मंञी,नेते व आमदार,खासदार यांच्या परिचयाचे असल्याने त्यांचे पारडे जड बनले आहे.ग्रा.पं.सदस्य म्हणुन मागील १० वर्षात निवडूण आलेल्या वार्डात त्यांनी मुलभूत,पायाभूत सोईसुविधा निर्माण केल्या आहेत.तसेच २००७ नंतर वाढवणा गटात रा.काॅं.पक्षाचा झेंडा फडवायचा निर्धार केलेल्या कार्यकर्ते व मतदारांमधून येणा-या निवडणुकीत ख्वाजा तांबोळी यांना प्रथम पसंती दिली जाते.तांबोळींनी विधानसभेला उदगीर,अहमदपुर या २ ठिकाणच्या उमेदवारासाठी राञं- दिवस प्रचार केला.म्हणुन नामदार बाबासाहेब पाटील व आमदार संजय बनसोडे हे पण तांबोळीसाठी उत्सूक असल्याचे समजते. आणि महायुती मधील वाढवणा गटातील कार्यकर्ते पण ख्वाजाभाईंनाच तिकीट मिळावे,अशी मागणी करताना दिसतात.ते महायुतीतील घटक पक्षातील पुढारी, नेते यांच्याही जवळचे असल्यामुळे आगामी निवडणुकीत वाढवणा जि.प. गटात ख्वाजाभाई तांबोळींनाच पक्ष श्रेष्ठी रणांगणात उतरविणार आणि २००७ नंतर पुन्हा या गटात घडीची टिकटिक ख्वाजाभाई तांबोळींमुळेच ऐकू येणार. अशी चर्चा ऐकू येत आहे.


0 टिप्पण्या