चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यातील वाढवणा (बू) महसुल मंडळाअंतर्गत असलेल्या हाळी व हंडरगुळीच्या शेतक-यांना अतिव्रष्टीची नुकसान भरपाई म्हणुन कुणाला ४ तर कुणाला ६ हजारच मिळाल्याने ही तफावत म्हणावे का, गोंधळात गोंधळ हेच कळत नसलेने नाराजी पसरली असून या गोंधळाची शासनाने चौकशी करावी.व निदान (१८,५०० ₹) घोषीत केल्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकरीबांधवातून होत आहे.
वाढवणा मंडळातील हाळीहंडरगुळी मधील शेतक-यांना अतिव्रष्टीतील नुकसानीपोटी मदत मिळाली असली तरीही मदतीच्या आकड्यात मोठी तफावत आहे.
कारण,दिवाळीपुर्वी हे.१८,५०० रु. देणार,अशी भीमगर्जना केलेल्या शासनाने अत्यंत तुटपूंजी रक्कम म्हणजे कुणाला ४ तर कुणाला ६ हजार अशीअकाउंटला टाकले आहे. आणि ही तफावत आहे का गोंधळ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नुकसानीपोटी मिळणा-या रकमेची वितरण प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हा सगळा गोंधळ उघडीस आला.आणि या तुटपूंज्या मदतीपेक्षा झालेले नुकसान लाख पटीने अधिक आहे. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात.
ही तफावत,गोंधळ याची शासनाने चौकशी करावी.आणि घोषणा केली त्याप्रमाणे रक्कम द्यावी.असे मत शेतकरी माधव माने यांनी मांडले.


0 टिप्पण्या