चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-हमीभाव खरेदी केंद्रात धान्य घालू इच्छिणा-या शेतक-यांना अंगठा (थंब) देणे शासनाने बंधनकारक केले असल्याने सर्वञ नाराजी,संताप व्यक्त होत असून शेतक-यांचा अंगठा घेणारे सरकार शिक्षण,वीज, आरोग्य,महसूल यासारख्या विभागा मधील शासकीय नोकरदारांचा थंब (अंगठा) का?घेत नाही.असा सवाल हाळी-हंडरगुळीतील शेतकरीवर्गाचा आहे.
कारण,हाळी-हंडरगुळी व परिसरात शिक्षण,आरोग्य,वीज,महसुल आदी विभागातील शासकीय नोकरदार ड्यूटीच्या ठिकाणी मुक्कामी थांबणे तर दुरच.उलट हे नोकरदार मनामध्ये येईल तेंव्हा अप-डाऊन करतात.अन् यांचे अंगठे व चेहरे तपासण्याऐवजी शेतक-यांचे अंगठे,चेहरे तपासणी करणा-या शासनाबद्दल सर्वञ तीव्र नाराजी पसरली असून याचा हाबाडा येणा-या झेड.पी.च्या निवडणुकीत सत्ताधा-यांना बसू शकतो.
हमीभाव खरेदी केंद्रात माल विक्री करणा-या शेतक-यांची आता बायो मेट्रीक हजेरी घेतली जाणार असून हमीभाव केंद्रात नाव नोंदतेवेळी व माल विकतेवेळी अंगठा द्यायचा.हे बंधनकारक केले आहे.नाव नोंदणी ३० आक्टोबर पासून सुरु झाली आहे.आणि यंदा हा नवीन नियम लागू केल्याने नाराजी पसरली आहे. प्रत्येकवेळेस शेतक-यांसाठी नवीन नियम,अटीशर्थी,त्यात आता अंगठा हा एकप्रकारे मानसिक ञास देणारा निर्णय आहे.तेंव्हा येथील सरकारी नोकरदारांचा पण अंगठा घेण्याचे धाडस शासन दाखविणार का?असा सवाल शेतकरी हरी दापकेंचा आहे.


0 टिप्पण्या